बांधकाम सील करताच भरले १.२२ कोटी, महापालिकेची कारवाई सुरूच

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मालमत्ता कर थकवल्याने महापालिकेने १० इमारत आणि बांधकाम व्यावसायिकांच्या जागांना सील ठोकल्यानंतर जाग आलेल्या ४ जणांनी थकीत १.२२ कोटी रुपयांची मालमत्ता कराची रक्कम महापालिकेकडे जमा केली.

महापालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या आणि वारंवार मागणी करुनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांबाबत सुरु करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत १० मालमत्तांना महापालिकेनं 'सील' ठोकलं आहे. यापैकी ४ मालमत्ताधारकांनी पैसे भरल्यानंतर त्यांच्या मालमत्ताचं 'सील' काढण्यात आलं. उर्वरित ६ मालमत्तांमध्ये 'एफ दक्षिण' विभागातील ४ मालमत्ता, 'आर मध्य' विभागातील एक मालमत्ता आणि'टी' विभागातील एक मालमत्ता यांचा समावेश आहे.

या ६ मालमत्तांवर एकूण रुपये १७ कोटी ६१ लाख ६६ हजार ७९० एवढा मालमत्ता कर थकित आहे. यामध्ये दादर-नायगाव रस्त्यावरील २ भूखंड, जेरबाई वाडीया मार्गावरील १ भूखंड, किडवई मार्गावरील १ भूखंड, बोरिवली पश्चिम आणि मुलुंड पश्चिम परिसरातील प्रत्येकी एक याप्रमाणे २ व्यवसायिक मालमत्तांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेचे करनिर्धारक व संकलक तथा सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी दिली.


हेही वाचा-

मालमत्ता कर न भरल्याने ७ विकासकांच्या साईट्स सील

बड्या धेंडांकडे महापालिकेचा ४५०० कोटींचा मालमत्ता कर थकित!


पुढील बातमी
इतर बातम्या