महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका विविध स्थरावर प्रयत्न करत आहे. कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळावे यासाठी मुंबईतील अनेक ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरू केले आहेत. अशातच दक्षिण मुंबईतील नाना चौक परिसरातील जगन्नाथ शंकरशेठ महापालिका शाळेतील दवाखान्यामध्ये कोरोनाची विनामूल्य चाचणी करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली आहे.

महापालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच गिरगाव, खेतवाडी, ग्रॅन्ट रोड, मलबार हिल, ताडदेव, मुंबई सेंट्रल परिसरातील ३५८६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी २६१६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्यस्थितीत ८१६ सक्रिय रुग्ण आहेत. महापालिकेचा ‘डी’ विभाग आणि आसपासच्या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असलेल्या रुग्णांना करोनाची चाचणी करण्यासाठी नायर रुग्णालयात अथवा खासगी प्रयोगशाळांमध्ये जावे लागत होते.

नायर रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. नायर रुग्णालयात संसर्ग होण्याचा धोका असल्याने अनेक जण चाचणीसाठी तेथे जाणे टाळतात. त्यामुळे अनेकांना खासगी प्रयोगशाळांमध्ये पैसे भरून चाचणी करून घ्यावी लागली आहे.

यासाठी ‘डी’ विभाग कार्यालयाने ग्रॅन्ट रोड येथील नाना चौक परिसरातील जगन्नाथ शंकरशेठ पालिका शाळेतील दवाखान्यात विनामूल्य चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे. दवाखान्यात तपासणी झाल्यानंतर लक्षणे पाहून ही चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.


हेही वाचा -

गुड न्यूज! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात, डाॅक्टरांनी पोलिसांना दिली ‘ही’ माहिती


पुढील बातमी
इतर बातम्या