सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण: डाॅक्टरांनी पोलिसांना दिली ‘ही’ माहिती

आतापर्यंत या प्रकरणात ३५ हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतचे डाँक्टर केरसीच्या चौकशीतून सुशांतच्या आत्महत्या करण्यामागेची कारणे उजेडात येऊ शकते.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण: डाॅक्टरांनी पोलिसांना दिली ‘ही’ माहिती
SHARES

नैराक्षेतून सुशांतने आत्महत्या केल्याचे बोलले जात असताना. नैराक्षेत असताना तो ज्या सायकॅट्रीस्ट आणि सायकोथेअरपीसाठी  डाॅक्टरांकडे उपचार घेत होता. त्या डाॅक्टरांचा वांद्रे (Bandra )पोलिसांनी काल रात्री जबाब नोंदवला. आतापर्यंत या प्रकरणात ३५ हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतचे डाॅक्टर केरसीच्या चौकशीतून सुशांतच्या आत्महत्या करण्यामागेची कारणे उजेडात येऊ शकतात.

हेही वाचाः-  Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या (sushant singh rajput suicide )करत जगाचा निरोप घेतला. मात्र सर्व काही सुरळीत सुरू असताना, त्याने इतके टोकाचे पाऊल का फचलले हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्या प्रकऱणीच पोलिसांनी आतापर्यंत ३५ जणांची चौकशी केली आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे बाॅलीवूड (Bollywood)मधील घराणेशाही कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. सुशांतने केलेले चित्रपटांचे काँन्ट्रेक्ट लेटर पोलिसांनी तपासासाठी मागवून घेतले होते. तर प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साळी, शेखर कपूर यांचे ही जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहे. आत्महत्येपूर्वी सुशांत हा नैराक्षेत होता. मानसिक तणावाखाली असल्याने तो सायकॅट्रीस्ट डाॅक्टर केरसी चावडा यांच्याजवळ उपचार घेण्यासाठी जात होता. त्यामुळे पोलिसांनी चावडा यांना गुरूवारी जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. रात्री उशिरपर्यंत त्यांच्या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया ही सुरू होती. या पूर्वी पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आदीत्य चोप्रा, संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali )यांची ही चार तास चौकशी केली होती.

हेही वाचाः- मुंबईत ४४३ अतिधोकादायक इमारती, तोडगा काढणारच- किशोरी पेडणेकर

तसेच या पूर्वी सुशांतला ‘पानी’ चित्रत्रपटाची आॅफर करणाऱ्या शेखर कपूर (Shekhar Kapoor)  यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वात पहिल्यांदा शेखर यांनी त्यांला ट्विटरवर श्रद्धांजली दिल्याची ही चर्चा आहे.  मात्र कोरोनामुळे शेखर हे सध्या उत्तरखंड येथे अडकून पडल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलावले असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी स्वत: जबाब लिहून पोलिसांना मेल केल्याचे सांगितले जात. या डाॅक्टरांच्या चौकशीतून पोलिसांना सुशांतच्या  मागील कारण स्पष्ठ होण्याचा अंदाज आहे. तर दोनच दिवसांपूर्वी सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीला इन्स्टाग्रामवर धमकी देण्यात आली होती. त्या प्रकऱणी सांताक्रूझ (Santa Cruz ) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली होती.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा