सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण: दिग्दर्शक शेखर कपूरने पाठवला ई-मेलद्वारे जबाब

पोलिसांनी शेखर कपूर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र शेखर यांनी स्वतः चौकशीला न येता, त्यांनी त्यांचा जबाब हा पोलिसांना ई-मेल केल्याचे सांगितले जात आहे.

सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण: दिग्दर्शक शेखर कपूरने पाठवला ई-मेलद्वारे जबाब
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी सोमवारी संजय लिला भन्साली यांची ३ तास चौकशी केली. बॉलिवूडमधील मोठ्या मीडिया हाऊसेसनी सुशांतला बॅन केल्याची चर्चा होती. याच कारणांवरून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात खरचं घराणेशाही सुरू आहे का ? याचा तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी शेखर कपूर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र शेखर यांनी स्वतः चौकशीला न येता, त्यांनी त्यांचा जबाब हा पोलिसांना ई-मेल केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः- Patient commits suicide at KEM Hospital, Parel परळच्या के.ई.एम रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

सुशांतसिंह राजपूतने इतके टोकाचे पाऊल का फचलले हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्या प्रकऱणीच पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांची चौकशी केली आहे. पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साली याला काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स पाठवला होता. त्यानुसार सोमवारी संजय लिला भन्साली हे सकाळी ११.३० च्या सुमारास चौकशीसाठी हजर झाले. तब्बल ३ तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी संजय लिला भन्साली यांना जाऊ दिले. पोलिसांनी भन्साली यांचा जबाब नोंदवून घेतला असून गरज पडल्यास त्यांना पून्हा बोलवण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. या दरम्यान सुशांतला ‘पानी’ चित्रत्रपटाची आँफर करणाऱ्या शेखर कपूर यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वात पहिल्यांदा शेखर यांनी त्यांला ट्विटरवर श्रद्धांजली दिल्याची ही चर्चा आहे.  मात्र कोरोनामुळे शेखर हे सध्या उत्तरखंड येथे अडकून पडल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलावले असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी स्वत: जबाब लिहून पोलिसांना मेल केल्याचे सांगितले जात.  शेखर यांनी सुशांतला पाणी या चित्रपटाची आँफरकेली होती. मात्र प्रोडक्शन कंपनीमुळे चर्चा पुढे होऊ शकली नाही. या चित्रपटासाठी सुशांतने तयारी देखील दर्शवली होती.  या गोष्टीमुळे सुशांत प्रचंड नाराज ही झाला होता.  सुशांतच्या आत्महत्येनंतर शेखर यांनी एक ट्विट ही केले होते.

भन्साली यांच्याप्रमाणे या प्रकरणात अन्य काही बड्या लोकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. आतापर्यत पोलिसांनी या प्रकरणात ३० जणांची चौकशीकरून जबाब नोंदवलेला आहे. सुशांतने केलेल्या आत्महत्येला बॉलिवूडमधील घराणेशाही कारणीभूत असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरण बिहारमध्ये एकताकपूर, संजय लिला भन्साळी, करण जोहर आणि सलमान खानसह ८ जणांवर याचिकाही दाखल केली होती. या आरोपाला संजय लिला भन्साळीकडून पत्राद्वारे उत्तर ही पाठवले होते. त्यात संजय लिला भन्साळी यांनी मी सुशांतला चार चित्रपटात काम करण्याची आँफर केली होती. मात्र सुशांत काम करत असलेल्या चित्रपटांच्या तारखा आणि मी दिलेल्या तारखा या सारख्याच असल्यामुळे त्याने माझी आँफर स्विकारली नसल्याचे कळवले होते.

हेही वाचा:- Molesting doctor at Covid care centre धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये त्याने काढली डाॅक्टरची छेड

सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी यांची केली चौकशी

नीरज सिंह (कुक)

केशव बचनेर (कुक)

दीपेश सावंत (घर का नॉकर)

सिद्धार्थ पीठानी (मैनेजर)

सावंत (मैनेजर )

सुशान्त की ३ बहनें

नीतू सिंह

मीतू सिंह

सुशान्त के पिता केके सिंह

चाभी बनाने वाला (२)

महेश शेट्टी (एक्टर और दोस्त)

मूकेश छाबरा (कास्टिंग डायरेक्टर)

श्रुति मोदी (बिजनेस मैनेजर)

राधिका तेहलानी (PR मैनेजर)

रिया चक्रबर्ती (सुशान्त की करीबी दोस्त)

संजना सांघी (अभिनेत्री)

आशिष पाटिल(YRF)पूर्व YRF कमर्चारी

आशिष सिंह (वाइस प्रेसिडेंट )YRF

शानू शर्मा कास्टिंग डायरेक्टर YRF

शोविक चक्रवर्ती (रिया का भाई और सुशान्त की कंपनी के डायरेक्टर

राधिका निहलानी (PR)

रोहणी अय्यर (मित्र औऱ पूर्व पीआर)

प्रियंका खिमानी (लीगल एडवाईजर सुशान्त सिंह)

उदय सिंह गौरी (टेलेंट मैनेजमेंट कम्पनी के मालिक)

कुशल झवेरी, मित्र

संजय श्रीधर , सीए.

२ बॉलीवुड वेब साइट्स के जनर्लिस्ट

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा