Molesting doctor at Covid care centre धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये त्याने काढली डाॅक्टरची छेड

ऐवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी जबरदस्तीही करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत डाँक्टर महिला किरकोळ जखमी झाली.

Molesting doctor at Covid care centre धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये त्याने काढली डाॅक्टरची छेड
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. मुंबईत कोरोना संक्रमित नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशात ऐकीकडे नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी डाँक्टर दिवसरात्र मेहनत करत असताना. काही ठिकाणी मात्र त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक केली जात आहे. असात काहीसा प्रकार अंबोली पोलिस ठाणे परिसरातील कोविंड सेंटरमध्ये घडला. एका महिला डाँक्टरची छेड काढल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी एका ३३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे १३८१ नवे रुग्ण, ६२ जणांचा दिवसभरात मृत्यू

 अंबोली पोलिस ठाण्यातील कोविड रुग्णांसाठी लक्ष्मी बिझनेस पार्क परिसरात कोविड-१९ सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी १५ जून रोजी आरोपी अ‍ॅग्नल फर्नांडिस याला क्वारन्टाइनसाठी आणले होते. त्याठिकाणी रुग्णांच्या देखभालीकरता महिला डाँक्टरांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान महिला डाँक्टर अ‍ॅग्नल फर्नांडिसला तपासून झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याबाजूला असलेल्या रुग्णाला तपासण्यासाठी वळाल्या त्यावेळी अ‍ॅग्नल फर्नांडिसने त्यांच्याशी गैरकृत्य करत त्यांची छेड काढली. ऐवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी जबरदस्तीही करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत डाँक्टर महिला किरकोळ जखमी झाली. तिने आरडा ओऱडा केल्यानंतर क्वारन्टाइन सेंटरमधील वाँर्डबाँय डाँक्टर महिलेच्या मदतीसाठी  धावून गेले.

हेही वाचाः- कोरोनाबाधीत रुग्णांना ‘गोलार’ रोबोटमार्फत औषधे, पाणी, जेवणाचा पुरवठा

या घटनेत डाँक्टर महिला जखमी झाल्याने तिला कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेले. तर आरोपी अ‍ॅग्नल फर्नांडिसलाही कूपर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात १६ जून रोजी भा.द.वि कलम ३५४, ३५३, ३३२, ३२३ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. आरोपी अ‍ॅग्नल फर्नांडिसवर कोविडचे उपचार सुरू असल्याने त्याला त्यावेळी अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान ७ जुलै रोजी तो कोविडमधून बरा झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुरावा म्हणून घटनास्थळाचे सीसीटिव्ही आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तीन ते चार जणांचे जबाब ही नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा