Patient commits suicide at KEM Hospital, Parel परळच्या के.ई.एम रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून वार्डमधील लोखंडी अॅगलला कपड्याच्या मदतीने गळफास घेतला.

Patient commits suicide at KEM Hospital, Parel परळच्या के.ई.एम रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या
SHARES

परळच्या के.ई.एम रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाने आजारपणाला कंटाळून रुग्णालयातच आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. शहाजी खरात (२०) असे या रुग्णाचे नाव आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात  आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  

हेही वाचाः- Molesting doctor at Covid care centre धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये त्याने काढली डाॅक्टरची छेड

चेंबूरच्या न्यू भारत नगर परिसरातील महालक्ष्मी वेल्फर सोसायटीत खरात हा त्यांच्या कुटुंबियांसोबत रहात  होता. दरम्यान त्याला रक्ताचा कर्करोग (कॅन्सर) झाला होता. त्याच्यावर इनलॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र जूनमध्ये  त्याला त्रास होऊ लागल्याने २३ जून रोजीत्याला उपचारासाठी परळच्या के.ई.एम रुग्णालयात हलवण्यात आले. २ जुलै रोजी त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचा वैद्यकिय अहवाल ही निगेटिव्ह आला. दरम्यान खरातवर के.ई.एमच्या वार्ड क्र ११ मध्ये उपचार सुरू होते. दरम्यान ८ जुलै रोजी शहाजीने आजारपणाला कंटाळून वार्डमधील लोखंडी अँगलला कपड्याच्या मदतीने गळफास घेतला. हीबाब लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने डाँक्टरांकडे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डाँक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. नैराक्षेतून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची अपमृत्यू म्हणून नोंद केली असून शहाजीच्या वडिलांचा ही जबाब नोंदवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे १३८१ नवे रुग्ण, ६२ जणांचा दिवसभरात मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा