Advertisement

Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपापल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय
SHARES

गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपापल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना दिली. (maharashtra government will provide msrtc bus for konkan during ganesh festival 2020)

यासंदर्भात अधिक माहिती देताना अनिल परब म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावी जातात. कोरोना संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून एसटीची सेवा पुरवण्यात येईल. 

परंतु काही अटी शर्ती आणि नियमांचं पालन करूनच चाकरमान्यांना एसटी बसची ही सुविधा पुरवण्यात येईल. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांसाठी काय नियम असतील याची माहिती लवकरच एसटीकडून देण्यात येईल. सरकारने देखील इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या गाईडलाइन मागवल्या आहे. या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असंही अनिल परब यांनी सांगितलं. 

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चेकपोस्ट तयार, दीड लाख लोकं येण्याची शक्यता

गणेशोत्सवाबाबत सरकारने वेळकाढू भूमिका घेतलेली नाही. कोकणातील स्थानिक रहिवासी असोत किंवा मुंबई, ठाणे, पुण्यातून कोकणात जाणारे चाकरमानी असोत, दोन्हीकडे आपलीच माणसं आहेत. त्यामुळे दोन्हीकडील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्याचनुसार सरकार विचारपूर्वक निर्णय घेत आहे. कोकणात घरे असलेले परंतु तिथे स्थायिक असलेले बरेच चाकरमानी आहेत. शिवाय गणेशोत्सवा दरम्यान केवळ एका दिवसासाठी किंवा ५ दिवसांसाठी जाणारेही शेकडो चाकरमानी आहेत. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा यावर सरकार कोकणातील स्थानिक प्रतिनिधी आणि गणेश मंडळांशी चर्चा करत आहे. साधेपणाने असला, तरी यंदाचा गणेशोत्सव आनंदात साजरा कसा होईल, कुठेही गर्दी होणार नाही, कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास मदत होणार नाही, याची काळजी घेऊनच सरकार परवानगी देणार आहे, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असणारआहे.  गणेशोत्सवानिमित्त एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड लाख लोकं येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई सीमेलगत व इतर ठिकाणीही चेक पोस्ट तयार झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुनाथ यांनी ही माहिती दिली. 

हेही वाचा - Ganesh Utsav 2020 : मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, लक्षात ठेवा 'हे' १० नियम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा