सांताक्रूझमध्ये महिलेवर बलात्कार करून केली हत्या

दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तिच्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

सांताक्रूझमध्ये महिलेवर बलात्कार करून केली हत्या
SHARES

हिंजवड येथील महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच सांताक्रूझमध्ये महिलेवर जबरदस्ती करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. सुनील कदम आणि विनोद घाडी अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी वाकोला पोलिस अधिक तपास करत आहेत. 

 

सांताक्रूझच्या पूर्वेकडील वाकोला इथल्या एका चाळीत हा खळबळजनक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी ही कुटुंबासोबत राहत होती. त्याचवेळी चाळीत एका खोलीत भाड्याने ३ तरुण राहत होते. संध्याकाळी यातील दोघे जण दारू पिण्यासाठी बसले होते. सातच्या सुमारास घरासमोरून पीडित तरुणी गेली. तेव्हा दोघांनी तिला आवाज दिला आणि घरात बोलावलं. दोघांनाही पीडिता ओळखत असल्यामुळे ती घरात गेली. दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तिच्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली म्हणून दोघांनी तिला बेदम मारहाण करत तिचे तोंड दाबून धरले, त्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणी कुठे याबद्दल बोलू नये म्हणून नराधमांनी तिची हत्या केली. तिच्या तोंडावर उशी दाबून आरोपींनी पीडितेचा जीव घेतला आणि पळ काढला. 

 

जेव्हा खोलीतील तिसरा तरुण आला तेव्हा त्याने तरुणीचा मृतदेह घरात पाहिला. त्याने तात्काळ याची माहिती शेजाऱ्यांना दिली आणि पोलिसांना याबद्दल कळवलं.पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. अहवालामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं. वाकोला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली असून दोन आरोपींना ठाणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं. पण या सगळ्या घटनेमुळे स्थानिकांंमध्ये संताप आहे.

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा