Advertisement

गुड न्यूज! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश

सोमवारी दिवसभरात ९६५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७२ हजार ६५० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

गुड न्यूज! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांनी १ लाखांचा टप्पा ओलांडल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झालेली. राज्यात आज कोरोनाने १७६ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण (Control over the coronaviris ) मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत सोमवारी दिवसभरात १०४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सोमवारी दिवसभरात  ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत (Coronavirus pandemic)रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- मुंबईत ४४३ अतिधोकादायक इमारती, तोडगा काढणारच- किशोरी पेडणेकर

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर (Corona death stats ) दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१ रुग्ण दगावले आहेत. तर १९ जुलै रोजी ६४ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १८ जुलै रोजी एकूण ६५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे १०४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १७८ इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात ९६५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७२ हजार ६५० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ६६७ नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४३४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- ‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१ठाणे-५नवी मुंबई मनपा-११कल्याण-डोंबिवली मनपा-११उल्हासनगर मनपा-६,वसई-विरार मनपा-२रायगड-४,पनवेल-२,नाशिक मनपा-२धुळे मनपा-१जळगाव-१८जळगाव मनपा-३पुणे-९पुणे मनपा-२२पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१सोलापूर मनपा-४सातारा-२कोल्हापूर-४सांगली-४,औरंगाबाद मनपा-३जालना-१,लातूर-२नांदेड मनपा-२अमरावती-१अमरावती मनपा-१बुलढाणा-२वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा