चैत्यभूमी दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेकडून २९ कोटींचा निधी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवाजी पार्कजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारकाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी २९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेने अर्थसंकल्पात इतका निधी राखीव ठेवला आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या  बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.

चैत्यभूमीच्या भिंती आणि छपराच्या सिमेंटच्या गिलाव्याची पडझड होऊ लागली आहे. या वास्तूचा मुख्य आधार असलेल्या खांबानाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ही वास्तू धोकादायक बनू लागल्याने महापालिकेने दुरूस्तीचा निर्णय घेऊन पालिका अर्थसंकल्पात २९ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. याआधी चैत्यभूमीच्या दुरूस्तीबाबत मुंबई महापालिकेने राज्य सरकारला साकडे घातले होते. त्यावरचैत्यभूमीच्या पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आल्याचे पालिकेला २१ नोव्हेंबर २०१९ पत्र पाठवून कळविण्यात आले होते. मात्र त्यावर गेले वर्षभर कार्यवाही झाली नव्हती.

पालिकेने चैत्यभूमीच्या दुरुस्तीचे काम अर्थसंकल्पीय तरतुदीतून तातडीने सुरू करावे अशी मागणी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली. याबाबत स्थायी समितीने निर्णय घेऊन २९ कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली. या निधीचा विनियोग करून त्वरित दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी आराखडे, संकल्पचित्र बनविण्याचे कार्य हाती घ्यावे. तसेच या कामाच्या प्रगतीबाबत पुढील बैठकीत प्रशासनाला निवेदन करावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.


हेही वाचा -

मध्य रेल्वे 'या' मार्गावर चालविणार ८ उपनगरी सेवा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या


पुढील बातमी
इतर बातम्या