गणेशोत्सव २०१९: ऐन सणासुदीच्या काळात सुका मेव्याच्या किमतीत वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून सर्वजण तयारीला लागले आहेत. घरगुती बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त सजावटीच्या समानांसह प्रसादाच्या सामानाचीही  खरेदी करत आहे. मात्र, यासामानांची खरेदी करताना गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे सुका मेव्याच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. कारण, सुका मेव्याच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

मोठ्या प्रमाणात मागणी

सणासुदीच्या काळात सुका मेव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळं सुका मेव्याच्या किंमतीत झालेली वाढ पाहायला मिळते. दरम्यान, मुंबईत अफगाणिस्तान, इराण, इराक, अमेरिका, काश्मीर व इतर ठिकाणांवरून सुका मेवा विक्रीसाठी येतो.

सुका मेव्याच्या किंमती

सुका मेवा

रुपये (प्रतिकिलो)

बदाम

९८० ते १२०० 

काजू 

१२५० ते २६००

किसमिस

११०० ते २२००

अंजीर 

१५०० ते २८००

पिस्ता सॉल्टेड

१९०० ते ३५००

पिस्ता प्लेन 

३२००

अक्रोड

१३०० ते २४००

जर्दाळू 

११०० ते १६००

खजूर   

४८० ते ११००

ममरा बदाम

३००० ते ६८००


हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये होणार जाहीर?

प्रलंबित मागण्यासाठी मराठा क्रांतीचा मोर्चा


पुढील बातमी
इतर बातम्या