आता विमानतळावर होणार मराठीत अनाऊसमेंट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांनो विमानात बसून घ्या, विमान उड्डाणासाठी तयार होत आहे. अशी मराठीतील उद्घोषणा (अनाऊंसमेंट) तुम्हाला राज्यातील एखाद्या विमानतळावर ऐकू आल्यास आश्चर्यचकीत होऊ नका. कारण लवकरच तुम्हाला सर्व विमानतळांवर स्थानिक भाषेत उद्घोषणा ऐकू येणार आहे. नागरी उड्डयणमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी सर्व विमानतळांना याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळं विमानतळावरील सार्वजनिक घोषणा सर्वात पहिल्यांदा स्थानिक भाषेत आणि त्यानंतर हिंदी तसंच इंग्रजीमध्ये होणार आहे.

मुंबई विमानतळाला सूट

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सर्व विमानतळांना सार्वजनिक उद्घोषणा स्थानिक भाषेत आणि त्यानंतर हिंदी वा इंग्रजी भाषेत करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या विमानतळात उद्घोषणा केल्या जात नाही, त्या विमानतळांना या निर्देशातून सूट देण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर सार्वजनिक उद्घोषणा बंद करण्यात आली असून केवळ गेटवरच उद्घोषणा केली जाते.

याबाबत, २०१६ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एक परिपत्रक काढलं होतं. या परिपत्रकामध्ये विमानतळात पहिला स्थानिक भाषेत त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सार्वजनिक घोषणा करण्याचे निर्देश दिले होते.


हेही वाचा-

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल

मुंबईतून धावणार आणखी एक 'राजधानी एक्स्प्रेस'


पुढील बातमी
इतर बातम्या