Advertisement

मुंबईतून धावणार आणखी एक 'राजधानी एक्स्प्रेस'

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत यावं लागत असल्याने या रेल्वे प्रवाशांनी राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वे मार्गे दिल्लीकडे रवाना करण्याची मागणी केली होती. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रवाशांची ही मागणी मंजूर केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

मुंबईतून धावणार आणखी एक 'राजधानी एक्स्प्रेस'
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आतार्यंत पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणारी राजधानी एक्स्प्रेस लवकरच मध्य रेल्वे मार्गावरून देखील धावणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत यावं लागत असल्याने या रेल्वे प्रवाशांनी राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वे मार्गे दिल्लीकडे रवाना करण्याची मागणी केली होती. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रवाशांची ही मागणी मंजूर केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.


प्रवाशांची गैरसोय टळणार

मध्य रेल्वे मार्गावर धावणारी नवी राजधानी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणार असून दिल्ली हे या एक्स्प्रेसचं शेवटचं स्थानक असणार आहे. या संदर्भातील अध्यादेश जारी होताच नवी राजधानी एक्स्प्रेस मुंबई-कल्याण-ठाणे- इगतपुरी-नाशिक रोड-मनमाड-जळगाव-भुसावळ मार्गे दिल्लीकडे धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ आणि होणारी गैरसोय टळणार आहे.


प्रस्तावाला मंजुरी

याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयात मंजुरीकरीता ठेवण्यात आला होता. अखेर सोमवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळं मध्य रेल्वेवर देखील लवकरच नवी राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे.



हेही वाचा-

मुंबईकरांना लवकरच मिळणार पहिली 'मेगा लोकल'

खूशखबर! एसी लोकलच्या तिकीट दरवाढीला स्थगिती



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा