Advertisement

मुंबईकरांना लवकरच मिळणार पहिली 'मेगा लोकल'

लवकरच येऊ घातलेली 'मेगा लोकल' हायएण्ड, वातानुकूलित असेल. या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आरामाकडे विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. ट्रेन टी-१८ या भारतीय बनावटीच्या ट्रेनच्या धर्तीवर ही ट्रेन बनवण्यात येत आहे.

मुंबईकरांना लवकरच मिळणार पहिली 'मेगा लोकल'
Pic Courtesy: Mid-Day
SHARES

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना गर्दीने हैराण झालेल्या प्रवाशांना लवकरच खूशखबर मिळणार आहे. कारण रेल्वे प्रशासन मुंबईकरांसाठी घेऊन येत आहे, पहिलीवहिली 'मेगा लोकल'. होय. नावाप्रमाणेच ही लोकल ट्रेन 'मेगा लोकल' असेल. या लोकलमध्ये सध्याच्या लोकलपेक्षा दुप्पट प्रवासी सामावून घेण्याची क्षमता असेल.


आधुनिक लोकल

लवकरच येऊ घातलेली 'मेगा लोकल' हायएण्ड, वातानुकूलित असेल. या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आरामाकडे विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. ट्रेन टी-१८ या भारतीय बनावटीच्या ट्रेनच्या धर्तीवर ही ट्रेन बनवण्यात येत आहे.


लवकरच सेवेत

या ट्रेनचं काम पूर्ण झाल्यावर आठवड्याभरात ही ट्रेन मुंबईत येऊन पोहोचेल. त्यानंतर चाचणी झाल्यावर अंदाजे ४ ते ६ महिन्यांत ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. सध्याची १२ डब्यांची लोकल ट्रेन ३ हजार ५०४ प्रवाशांना वाहून नेऊ शकते. ज्यामध्ये १ हजार १६८ आसनक्षमता आणि २ हजार ३३६ प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात.


प्रवासी क्षमतेत वाढ

तर सध्याची एसी लोकल १ हजार ०२८ आसनक्षमता आणि ४ हजार ९३६ उभ्या प्रवाशांसोबत एकूण ५ हजार ९६४ प्रवाशांना वाहून नेऊ शकते. मात्र नवी 'मेगा लोकल' या दोन्ही लोकलच्या पुढं असून या ट्रेनची प्रवासी क्षमता ६ हजार ५०० प्रवाशांहून अधिक आहे. सोबतच या ट्रेनचे दरवाजेची स्वयंचलीतच असतील.


हेही वाचा-

खूशखबर! एसी लोकलच्या तिकीट दरवाढीला स्थगिती

एसी लोकलची वर्षपूर्ती, वर्षभरात ३८.६८ लाख प्रवाशांनी केला प्रवासRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा