Advertisement

एसी लोकलची वर्षपूर्ती, वर्षभरात ३८.६८ लाख प्रवाशांनी केला प्रवास

नाताळचं औचित्य साधून या लोकलला २५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सेवेत दाखल केलं होतं. सुरुवातीला तिकीट दरांमुळे सामान्य प्रवाशांनी ही सेवा नाकारली असली, हळूहळू प्रवाशांनी एसी लोकलला आपलंस केलं. त्यानुसार आतापर्यंत ३८.६८ लाख प्रवाशांनी या एसी लाेकलमधून प्रवास केला आहे.

एसी लोकलची वर्षपूर्ती, वर्षभरात ३८.६८ लाख प्रवाशांनी केला प्रवास
SHARES

गेल्यावर्षी २५ डिसेंबरला देशातील पहिली वातानुकूलित (एसी) लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावली. येत्या २५ डिसेंबरला या वातानूकूलित लोकलला एक वर्ष पूर्ण होत आहे. नाताळचं औचित्य साधून या लोकलला २५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सेवेत दाखल केलं होतं. सुरुवातीला तिकीट दरांमुळे सामान्य प्रवाशांनी ही सेवा नाकारली असली, हळूहळू प्रवाशांनी एसी लोकलला आपलंस केलं. त्यानुसार आतापर्यंत ३८.६८ लाख प्रवाशांनी या एसी लाेकलमधून प्रवास केला आहे.


मध्य रेल्वेवर अडचणी

सुरूवातीला एसी लोकल मध्य रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार होती. त्यासाठी लोकलची चाचणीही घेण्यात आली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान असलेल्या पुलांच्या कमी उंचीमुळं ही लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावली नाही. त्यानंतर, पश्चिम रेल्वेनं वातानुकूलित लोकल चालवण्याची तयारी दर्शविल्यावर ही लोकल पश्चिम रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आली.


१६ कोटी ७७ लाखांची कमाई

लोकलच्या चर्चगेट ते विरार या मार्गावर एकूण १२ फेऱ्या होतात. यामधील दोनच फेऱ्या गर्दीच्या वेळेत असतात. तरीही एसी गाडीतून २५ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ३८.६८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातील ३५.७४ लाख प्रवासी पासधारक असून २.९४ लाख प्रवासी तिकीटधारक आहेत. एसी लोकलची दिवसाची सरासरी कमाई ६ लाख होते. त्यानुसार, २५ डिसेंबर २०१७ ते १७ डिसेंबर २०१८ पर्यंत एसी लोकलची एकूण कमाई १६ कोटी ७७ लाख २२ हजार ७७३ रुपये इतकी झाली आहे. 


धिम्या मार्गावरही सेवा

एसी लोकल दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवार आणि शनिवारी बंद ठेवण्यात येते. सुरुवातीच्या काळात एसी लोकल मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड या स्थानकांवर थांबत होती. आता मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँटरोड, दहीसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा या स्थानकांवरही ही लोकल थांबविण्यात येते. १ ते २० डिसेंबर या काळात ७ स्थानकांतून २७०० तिकिटांची विक्री झाली असून ३४ हजार प्रवाशांनी एसी प्रवासाचा अनुभव घेतला. त्यातून पश्चिम रेल्वेला ३३.७६ लाख रुपयांची कमाई झाली आहे. डिसेंबरच्या २० दिवसांत पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत १४.०८ लाखांची भर पडली आहे. 

येत्या काळात आणखी १० ते १२ लोकल मुंबईत प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. तसंच, या लोकल बनविण्याचं काम देखील ‘भेल’ या कंपनीला देण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच मुंबईत वातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.



हेही वाचा-

Exclusive: पुण्यावरून थेट बीकेसीत १४ मिनिटांत, हायपरलूपचं शेवटचं स्थानक बीकेसी?

पश्चिम रेल्वेवर 'लेडिज स्पेशल', २५ डिसेंबरपासून धावणार आणखी २ गाड्या



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा