Advertisement

पश्चिम रेल्वेवर 'लेडिज स्पेशल', २५ डिसेंबरपासून धावणार आणखी २ गाड्या

आतापर्यंत या मार्गावर ८ लेडिज स्पेशल लोकल धावत आहेत. या नव्या २ लोकल सुरु झाल्यानंतर प. रेल्वे मार्गावर एकूण १० लेडिज स्पेशल लोकल धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर 'लेडिज स्पेशल', २५ डिसेंबरपासून धावणार आणखी २ गाड्या
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील महिला प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण, येत्या २५ डिसेंबरपासून महिला प्रवाशांसाठी २ नव्या ‘लेडिज स्पेशल’ गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘लेडिज स्पेशल’ गाड्यांची संख्या ८ वरून १० वर गेली आहे. तसंच या दोन्ही गाड्या या दोन्ही नवीन गाड्या धिम्या मार्गावरून धावणार आहेत. त्यामुळं आता महिला प्रवाशांचा प्रवास आता आणखीनच सुखकर होणार आहे.


एकूण १० लोकल

येत्या २५ डिसेंबरपासून या गाड्या गर्दीच्या वेळेत नियमित धावणार आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८ लेडिज स्पेशल लोकल धावत आहेत. या नव्या २ लोकल सुरु झाल्यानंतर प. रेल्वे मार्गावर एकूण १० लेडिज स्पेशल लोकल धावणार आहेत. यामधील ६ अप मार्गावर धावणार आहेत, तर ४ डाऊन मार्गवार धावणार आहेत. तसंच या २ नवीन गाड्या धिम्या मार्गावर धावणार आहेत. या दोन नव्या लेडिज स्पेशल लोकलमधील एक लोकल सकाळी ९.०६ वाजता विरार स्थानकातून सुटेल, तर दुसरी लोकल १०.०४ वाजता भाईंदर स्थानकातून सुटेल.


'अप' मार्गावर धावणाऱ्या गाड्या

  • विरार – चर्चगेट ही लोकल सकाळी ७.३५ वाजता विरार स्थानकातून सुटणार असून ९.१५ ला चर्चगेट स्थानकात पोहोचेल.
  • बोरिवली – चर्चगेट ही लोकल सकाळी ७.४० वाजता विरार स्थानकातून सुटणार असून ८.४७ ला चर्चगेट स्थानकात पोहोचेल.
  • विरार – चर्चगेट ही लोकल सकाळी ८.५६ वाजता विरार स्थानकातून सुटणार असून १०.४९ ला चर्चगेट स्थानकात पोहोचेल.
  • भाईंदर – चर्चगेट ही लोकल सकाळी ९.०६ वाजता विरार स्थानकातून सुटणार असून १०.३० ला चर्चगेट स्थानकात पोहोचेल.
  • विरार – चर्चगेट ही लोकल सकाळी ९.४७ वाजता विरार स्थानकातून सुटणार असून ११.०७ ला चर्चगेट स्थानकात पोहोचेल.
  • वसई रोड – चर्चगेट ही लोकल सकाळी १०.०४ वाजता विरार स्थानकातून सुटणार असून ११.३० ला चर्चगेट स्थानकात पोहोचेल.


डाऊन मार्गावर धावणाऱ्या गाड्या

  • चर्चगेट - बोरिवली ही लोकल संध्याकाळी ५.३९ वाजता चर्चगेट स्थानकातून सुटणार असून ६.४८ ला बोरिवली स्थानकात पोहोचेल.
  • चर्चगेट - विरार ही लोकल संध्याकाळी ६.१३ वाजता चर्चगेट स्थानकातून सुटणार असून ७.५७ ला विरार स्थानकात पोहोचेल.
  • चर्चगेट - विरार ही लोकल संध्याकाळी ६.५१ वाजता चर्चगेट स्थानकातून सुटणार असून ८.३९ ला विरार स्थानकात पोहोचेल.
  • चर्चगेट - विरार ही लोकल संध्याकाळी ७.४० वाजता चर्चगेट स्थानकातून सुटणार असून ९.०६ ला विरार स्थानकात पोहोचेल.

या नव्या लोकलमुळे सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांची विरार स्थानकावरून सुटणारी लेडिज स्पेशल लोकल १२ मिनिटे उशिराने धावेल. ती सकाळी ८ वाजूून ५६ मिनिटांनी सुटणार आहे.


प. रेल्वेवरील पहिली लोकल

दरम्यान, ५ मे, १९९२ रोजी जगातील पहिली महिला विशेष गाडी पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला चर्चगेट ते बोरीवली स्थानकादरम्यान सुरू असलेली ही सेवा १९९३ साली विरार स्थानकापर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यामुळं नियमीतपणे लेडीज डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना याच मोठ्या प्रमाणात फायदा झाला, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.हेही वाचा-

दुरुस्तीसाठी बंद केलेला वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

ख्रिसमससाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेनRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा