Advertisement

ख्रिसमससाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन


ख्रिसमससाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन
SHARES

ख्रिसमसची सुट्टी पडली की अनेकांना वेध लागलात ते गोवा, मालवण, कोकणला फिरण्याचे. प्रवाशांचा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तसंच या दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई - करमाळी आणि मुंबई-मडगाव मार्गावर विशेष ट्रेन चालवण्याचा येणार आहेत.


मुंबई - करमाळी

ट्रेन क्रमांक ०२००१ ही २५ डिसेंबर आणि १ जानेवारीला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार असून दुपारी १.३० वाजता करमाळी स्थानकात पोहोचणार आहे.


मुंबई - मडगाव

ट्रेन क्रमांक ०११२७ ही २७ डिसेंबर आणि ३ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०५ला सुटणार असून मध्यरात्री १२.३५ वाजता मडगाव स्थानकात पोहोचणार आहे.


करमाळी - मुंबई

ट्रेन क्रमांक ०२००२ ही २५ डिसेंबर आणि १ जानेवारीला करमाळी येथून दुपारी २ वाजता सुटणार असून रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.


मडगाव - मुंबई

ट्रेन क्रमांक ०११३८ ही २७ डिसेंबर आणि ३ जानेवारीला मडगाव येथून सकाळी ६ वाजता सुटणार असून सायंकाळी ५.५५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे.



हेही वाचा-

बेस्ट कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर

प. रेल्वेवरील अपघातांना बसणार आळा, रुळांत बसवली 'एटीईएस' यंत्रणा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा