प. रेल्वेवरील अपघातांना बसणार आळा, रुळांत बसवली 'एटीईएस' यंत्रणा

ट्रेनच्या चाकांचं घर्षण, ब्रेक, व्हॅक्यूम प्रेशर, इंजिन आणि कोचमध्ये बिघाड झाल्यास त्याची माहिती सर्वप्रथम ट्रेनच्या लोको पायलटला मिळण्याची या यंत्रणेत व्यवस्था आहे. त्यामुळं पायलटला वेळेत या बिघाडावर मात करता येईल. सद्यस्थितीत या यंत्रणेची चाचणी करण्यात येत असून ही चाचणी यशस्वी ठरल्यास रेल्वे प्रशासनाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

SHARE

पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातांची संख्याभविष्यात कमी होण्याचीचिन्हेआहेत. पश्चिम रेल्वेने दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर 'ऑटोमॅटीक ट्रेन एक्झामिनेशन सिस्टिम' (एटीईएस) यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. ही सिस्टीम धावत्या ट्रेनला पूर्णपणे स्कॅन करून होणारा तांत्रिक बिघाड तात्काळ नियंत्रण कक्षाला पाठवणार आहे. त्यामुळं रेल्वे अपघाताच्या संख्येत घट होणार आहे.

लोको पायलटला माहिती

ट्रेनच्या चाकांचं घर्षण, ब्रेक, व्हॅक्यूम प्रेशर, इंजिन आणि कोचमध्ये बिघाड झाल्यास त्याची माहिती सर्वप्रथम ट्रेनच्या लोको पायलटला मिळण्याची या यंत्रणेत व्यवस्था आहे. त्यामुळं पायलटला वेळेत या बिघाडावर मात करता येईल. सद्यस्थितीत या यंत्रणेची चाचणी करण्यात येत असून ही चाचणी यशस्वी ठरल्यास रेल्वे प्रशासनाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.  

उच्च दर्जाचे कॅमेरे

'एटीईएस' ही रेल्वेची एक आधुनिक यंत्रणा आहे. रेल्वे दोन रुळांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येते. यामध्ये उच्च रिझोल्यूशनचे एचडी सेन्सर कॅमेरे बसवलेले असतात. हे कॅमेरे ७० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या ट्रेनचे फुटेज स्क्रीन शॉटच्या स्वरूपात एकत्र करतात. त्याचप्रमाणं या कॅमेऱ्यामध्ये नाईट व्हिजन बसवण्यात आल्याने रात्रीच्या वेळेस देखील गाडीचे फोटे काढण्यास मदत होते.हेही वाचा-

सांताक्रूझचा पादचारी पूल ३१ डिसेंबरपासून प्रवाशांसाठी खुला

पश्चिम रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना करता येणार शॉपिंगसंबंधित विषय
ताज्या बातम्या