पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल दुरुस्तीच्या कामाकरीता बंद ठेवण्यात आला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचं काम अत्यंत धिम्यागतीनं सुरु असल्याने या पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांना धक्काबुक्की सहन करावी आहे. याबाबत मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी पश्चिम रेल्वे विभागीय महाव्यवस्थापक व मुख्य अभियंता यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हा पादचारी पूल ३१ डिसेंबर २०१८ रोजी प्रवाशांसाठी खुला होईल, असं रेल्वे प्रशासनातर्फे लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे.
#मनसेईम्पेक्ट
— Akhil Chitre (@akhil1485) December 19, 2018
अखेर दि. ३१ डिसेंबर २०१८ ह्या दिवशी सांताक्रुझ पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला होईल असं रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. अर्थात, ३१ डिसेंबरच्या मुदतीनुसार पादचारी पूल खुला झाला तर उत्तम अन्यथा #मनसेदणका निश्चित.
प्रश्न कोणताही असो, उत्तर फक्त 'मनसे' आहे! pic.twitter.com/bzdlb8xCLU
दुरुस्तीच्या कामासाठी हा पादचारी पूल केवळ ११ सप्टेंबर ते ३० नोव्हेबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार होता. मात्र, २ महिने उलटून गेले तरी या पुलाच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं येथील स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजी आहे. हा पूल बंद असल्यानं प्रवाशांना स्थानकातील मधल्या पुलाचा वापर करावा लागतो. परंतु या पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्यामुळं याठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन चित्रे यांनी पश्चिम रेल्वे विभागीय महाव्यवस्थापक व मुख्य अभियंता यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी सांताक्रूझ स्थानकातील पादचारी ३१ डिसेंबर रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं लेखी स्वरूपात सांगितलं आहे.
हेही वाचा-
प.रे.वर नोव्हेंबरमध्ये १४.८१ कोटींचा दंड वसूल
पश्चिम रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना करता येणार शॉपिंग