Advertisement

पश्चिम रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना करता येणार शॉपिंग


पश्चिम रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये        प्रवाशांना करता येणार शॉपिंग
SHARES

पश्चिम रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात लवकरच शॉपिंगची सेवा सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या १६ मेल आणि एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ५ वर्षांसाठी ३.६६ कोटी रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आलं आहे. त्यामुळं आता लवकरच लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना शॉपिंग करता येणार आहे. 


आठ टप्प्यांमध्ये सुरू 

नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणं ही सुविधा आठ टप्प्यांमध्ये सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात तीन ट्रेनमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. तसंच नियमानुसार, कंपनीचे दोन सेल्समन कंपनीचे ओळखपत्र आणि गणवेशासह असणार आहेत. या सुविधेअंतर्गत प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये शॉपिंग कार्ट उपलब्ध असणार आहे. प्रवाशांना कॅशसोबतच क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या सहाय्याने शॉपिंग करता येणार आहे. 


तंबाखू, गुटखा, सिगारेट नाही

 ट्रेनमध्ये सौंदर्यप्रसाधन, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचं साहित्य इत्यादी वस्तू विकण्याची परवानगी असणार आहे. मात्र, तंबाखू, गुटखा आणि सिगारेट या वस्तू विकण्यास परवानगी नाही आहे. तसंच ट्रेनमधील सेल्समनला सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सामानाची विक्री करता येणार आहे. त्याचप्रमाणं सामानाची विक्री करताना सेल्समननी मोठ्या आवाजात सामानाची विक्री करु नये, ज्यामुळं प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.



हेही वाचा - 

पश्चिम रेल्वेवर लावणार आणखी १६ सरकते जिने, ५ लिफ्ट

प.रे.वर नोव्हेंबरमध्ये १४.८१ कोटींचा दंड वसूल




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा