Advertisement

पश्चिम रेल्वेवर लावणार आणखी १६ सरकते जिने, ५ लिफ्ट

पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर सद्यस्थितीत ३२ सरकते जिने आणि १८ लिफ्ट कार्यरत आहेत. त्याचसोबत विविध स्थानकांवर २० सरकते जिने आणि ५४ लिफ्ट बसविण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर लावणार आणखी १६ सरकते जिने, ५ लिफ्ट
SHARES

पश्चिम रेल्वेच्या १० रेल्वे स्थानकांवर १६ सरकते जिने आणि ४ स्थानकांवर लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसह महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

गर्दीच्या वेळेत पादचारी पूल चढताना आणि उतरताना ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि महिला प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळं पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर सद्यस्थितीत ३२ सरकते जिने आणि १८ लिफ्ट कार्यरत आहेत. त्याचसोबत विविध स्थानकांवर २० सरकते जिने आणि ५४ लिफ्ट बसविण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.


'या' स्थानकात सरकते जिने

मालाड स्थानकात ३ सरकते जिने, लोअर परळ, मिरा रोड, नालासोपारा आणि विरार स्थानकात प्रत्येकी २ सरकते जिने तसंच खार रोड, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर स्थानकांत प्रत्येकी एक सरकता जिना बसविण्यात येणार आहे.


'या' स्थानकात लिफ्ट

अंधेरी, बोरिवली, विरार स्थानकांत प्रत्येकी १, तर भाईंदर स्थानकात २ अशा एकूण ५ नव्या लिफ्ट बसविण्यात येणार आहेत.



हेही वाचा-

मुंबईकरांना धावत्या लोकलमध्ये मिळणार मोफत वायफाय

मिनी ट्रेनच्या एसी बोगीमुळे मध्य रेल्वेला ७८ हजार रुपयांची कमाई



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा