Advertisement

मुंबईकरांना धावत्या लोकलमध्ये मिळणार मोफत वायफाय

पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय लोकलसह राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या ६० ते ७० दिवसांत ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

मुंबईकरांना धावत्या लोकलमध्ये मिळणार मोफत वायफाय
SHARES

सद्यस्थितीत दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकांवरील मोफत वायफाय सेवेचा लाभ घेत आहेत. लोकल उशीरा येणार असेल, तर स्थानकांवरील वायफाय वापरून प्रवासी आरामात वेळ मारून नेतात. आता हिच मोफत वायफाय सुविधा प्रवाशांना धावत्या लोकलमध्ये देखील उपलब्ध होणार आहे.


प. रेल्वेचा प्रस्ताव तयार

पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय लोकलसह राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या ६० ते ७० दिवसांत ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. पश्चिम रेल्वेवर रोज सुमार ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळं ही सुविधा सुरु झाल्यास पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी शक्याता वर्तवण्यात येत आहे.


लवकरच निविदा प्रक्रिया

खासगी वायफाय पुरवठादाराने याबाबत पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत लोकलमध्ये वायफाय सुविधा पुरवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार, या सुविधेला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. निविदा आल्यानंतर लोकलमध्ये वायफाय राऊटर बसवून त्याची चाचणी करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

८ पदरी बोगदा फोडणार सायन-पनवेलची वाहतूककोंडी

'एमएमआरडीए'ने घेतला मोनोरेलचा ताबा, स्कोमी, एल अँड टीची हाकालपट्टी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा