Advertisement

मिनी ट्रेनच्या एसी बोगीमुळे मध्य रेल्वेला ७८ हजार रुपयांची कमाई


मिनी ट्रेनच्या एसी बोगीमुळे मध्य रेल्वेला ७८ हजार रुपयांची कमाई
SHARES

हिवाळ्यात माथेरानमध्ये पर्यटकांची वाढणारी गर्दी आणि मिनी ट्रेनला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेनं मिनी ट्रेनला एक वातानुकूलीत डबा जोडला आहे. ८ डिसेंबररपासून हा एसी डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. तेव्हापासून म्हणजे, ८ डिसेंबर पासून १८ डिसेंबरपर्यंत मध्य रेल्वेला ७८ हजार रुपयांची कमाई झाली आहे.


प्रवाशांची पसंती

माथेरानच्या मिनी ट्रेनच्या वातानुकूलीत बोगीला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. नेरळ ते माथेरान अशा ६ थेट फेऱ्यांपैकी अप आणि डाऊन अशा दोन्ही फेऱ्यांना एसी कोच जोडण्यात आला आहे. मिनी ट्रेनच्या वातानुकूलीत बोगीमुळे सुरुवातीच्या ३ दिवसांतच मध्य रेल्वेनं ३० हजार रुपयांची कमाई केली होती.


चांगली कमाई

१६ प्रवाशांची क्षमता असलेल्या वातानुकूलीत डब्याचं तिकीट प्रतिप्रवासी ४१५ रुपये आहे. त्यानुसार १० दिवसांत नेरळ ते माथेरान प्रवासाची १४० तिकिटे विकली गेली आहेत. यामधून मध्य रेल्वेला ५८ हजार १०० रुपयांची कमाई झाली आहे, तर माथेरान ते नेरळ परतीच्या प्रवासाची ४८ तिकिटे विकले गेले असून यामधून १९ हजार ९२० रुपयांची कमाई मध्य रेल्वेला झाली आहे.हेही वाचा-

आता फॅमिली पिकनीकसाठी बुक करा माथेरानची मिनी ट्रेन

माथेरानमधील पर्यटक मिनी ट्रेनच्या एसी प्रवासाने खूशRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा