Advertisement

माथेरानमधील पर्यटक मिनी ट्रेनच्या एसी प्रवासाने खूश

हिवाळ्यात थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माथेरानमध्ये हजेरी लावतात. त्यानुसार पर्यटकांची वाढती गर्दी पाहून मिनी ट्रेनच्या प्रवासाकरीता मध्य रेल्वेनं रविवारी मिनी ट्रेनच्या फेरीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

माथेरानमधील पर्यटक मिनी ट्रेनच्या एसी प्रवासाने खूश
SHARES

माथेरानमधील मिनी ट्रेनची वातानुकूलित सेवा पर्यटकांच्या चांगलीच पसंतीची ठरल्याचं दिसत आहे. कारण मिनी ट्रेनच्या एसी बोगीमुळे ३ दिवसांतच मध्य रेल्वेनं ३० हजार रुपयांची कमाई केली आहे.


किती रुपये तिकीट?

नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर धावणाऱ्या मिनी ट्रेनला ८ डिसेंबरपासून एक वातानुकूलित डबा जोडण्यात आला. या डब्यात १६ प्रवासी बसण्याची क्षमता असून या डब्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीटीसाठी ४१५ रुपये मोजावे लागतात. हा तिकीट दर जास्त असल्यामुळं प्रवाशांचा या एसी डब्याला प्रतिसाद मिळेल का?, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना पडला होता. मात्र, ३ दिवसांतचं प्रवाशांनी 'हाउसफूल्ल' असा प्रतिसाद दिला.


फेरीत वाढ

हिवाळ्यात थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माथेरानमध्ये हजेरी लावतात. त्यानुसार पर्यटकांची वाढती गर्दी पाहून मिनी ट्रेनच्या प्रवासाकरीता मध्य रेल्वेनं रविवारी मिनी ट्रेनच्या फेरीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. रविवारी नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ या दोन्ही फेऱ्यांतील एसी बोगी पर्यटकांनी फूल्ल झाली होती.



हेही वाचा-

मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान आजपासून ब्लॉक

सज्ज व्हा! मुंबई-नाशिक लोकल प्रवासासाठी, चाचणी सुरू



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा