Advertisement

आता फॅमिली पिकनीकसाठी बुक करा माथेरानची मिनी ट्रेन

सुट्टीच्या दिवशी किंवा विकेण्डला अनेक जण माथेरानमध्ये जात असतात. त्यांच्यासाठी माथेरानच्या मिनी ट्रेनची सुविधा मध्य रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये आणखी भर म्हणजे एखाद्या पर्यटकाला फॅमिली सेलिब्रेशन करायचे असेल तर चार्टर्ड ट्रेन म्हणून मिनी ट्रेनला खासगी तत्त्वावर बुक करता येणार आहे.

आता फॅमिली पिकनीकसाठी बुक करा माथेरानची मिनी ट्रेन
SHARES

माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी मध्ये रेल्वेनं विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये प्रवाशांचे आकर्षण असलेल्या मिनी ट्रेनला आता एक वातानुकूलीत डबा देखील जोडण्यात आला आहे. मात्र, आता याच मिनी ट्रेनला फॅमिली पिकनिक, बर्थ डे किंवा पार्टीसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून बुक करता येईल. 


९५ हजार रुपये भाडे

सुट्टीच्या दिवशी किंवा विकेण्डला अनेक जण माथेरानमध्ये जात असतात. त्यांच्यासाठी माथेरानच्या मिनी ट्रेनची सुविधा मध्य रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये आणखी भर म्हणजे एखाद्या पर्यटकाला फॅमिली सेलिब्रेशन करायचे असेल तर चार्टर्ड ट्रेन म्हणून मिनी ट्रेनला खासगी तत्त्वावर बुक करता येणार आहे. तसंच या संपूर्ण ट्रेनसाठी ९५ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. सकाळी नेरळ स्थानकातून ही ट्रेन सुटणार असून परतीचा प्रवास देखील याच ट्रेनमधून करता येणार आहे.


फेऱ्या वाढवल्या

मिनी ट्रेनला ८ डिसेंबरला एक वातानुकूलीत डबा जोडण्यात आला. या डब्यातून प्रवासासाठी प्रती प्रवासी ४१५ रुपये मोजावे लागतात. त्याचप्रमाणं, माथेरानमध्ये वाढती गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी नेरळ ते माथेरान फेऱ्यांची संख्या नुकतीच सहा करण्यात आली आहे. यातील दोन फेऱ्यांना एसीचा एक डबा जोडण्यात आला आहे.



हेही वाचा - 

धुक्याने अडवली लोकलची वाट, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल

माथेरानमधील पर्यटक मिनी ट्रेनच्या एसी प्रवासाने खूश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा