Advertisement

धुक्याने अडवली लोकलची वाट, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल

थंडीमध्ये वाढत्या धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी लोकल कमी वेगाने चालवल्या जातात. परंतु लोकल कमी वेगाने धावल्यास पुढील गाड्यांचं वेळापत्रक बिघडतं. यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने खोपोली, कसारा, कर्जत स्थानकांतून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल पहाटेच्या वेळी १० ते १५ मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

धुक्याने अडवली लोकलची वाट, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल
SHARES

सकाळ-संध्याकाळी पडणाऱ्या थंडीचा फटका रेल्वेलाही बसू लागला आहे. कमी तापमानामुळे मध्य रेल्वेच्या कसारा, कर्जत मार्गावर धुके पसरत असल्याने अपघात टाळण्यासाठी या लोकल कमी वेगाने चालवावी लागत आहे. त्यामुळं नोकरदारांना चांगलाच मनस्तान सहन करावा लागत आहे. लोकल फेऱ्यांचा हा लेटमार्क टाळण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवासी संघटनांना विचारात घेऊन पहाटेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.


बैठकीत निर्णय

थंडीमध्ये वाढत्या धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी लोकल कमी वेगाने चालवल्या जातात. परंतु लोकल कमी वेगाने धावल्यास पुढील गाड्यांचं वेळापत्रक बिघडतं. यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात प्रवासी संघटनांची गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत खोपोली, कसारा, कर्जत स्थानकांतून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल पहाटेच्या वेळी १० ते १५ मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


प्रवाशांना माहिती देणार

त्याचप्रमाणं, हवामान विभागाशी समन्वय साधून येत्या काही दिवसांमध्ये कोणत्या लोकल फेऱ्या १५ मिनिटे आधी चालवण्यात येणार आहेत, याची सविस्तर माहिती प्रवाशांना देण्यात येणार आहे. ज्या लोकल पहाटे १५ मिनिटे आधी चालवल्या जातील त्याबाबत सर्व स्थानकांमध्ये प्रवाशांना उद्घोषणेद्वारे माहिती देण्यात येणार आहे.


एक्स्प्रेसला प्राधान्य नको

गर्दीच्या वेळेत लोकल थांबवून मेल-एक्स्प्रेसना प्राधान्य दिले जातं. याबाबत गुरुवारी मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या बैठकीत प्रवासी संघटनांनी प्रवाशांच्या दृष्टीनं विचार करून लोकल थांबवून मेल-एक्स्प्रेसना प्राधान्य देऊ नये, अशी मागणी केली.हेही वाचा-

माथेरानमधील पर्यटक मिनी ट्रेनच्या एसी प्रवासाने खूश

सज्ज व्हा! मुंबई-नाशिक लोकल प्रवासासाठी, चाचणी सुरूRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा