Advertisement

दुरुस्तीसाठी बंद केलेला वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

पुलाच्या दुरुस्तीसाठी ८ डिसेंबरपासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तर पुलाची एक बाजू केवळ हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली होती. परिणामी या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूककोंडी होत होती. परंतु पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आल्यानं ठाणे, नवी मुंबई, भिवंडीतील वाहतूककोंडी कमी होणार आहे.

दुरुस्तीसाठी बंद केलेला वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला
SHARES

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून हा पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

वाहतूककोंडी संपणार

पुलाच्या दुरुस्तीसाठी ८ डिसेंबरपासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तर पुलाची एक बाजू केवळ हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली होती. परिणामी या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूककोंडी होत होती. परंतु पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आल्यानं ठाणे, नवी मुंबई, भिवंडीतील वाहतूककोंडी कमी होणार आहे.

२ टप्प्यांत काम

नवीन पुलाच्या दुरुस्तीचे काम २ टप्प्यांत करण्यात आलं आहे. या पुलावरील एका दिशेच्या दुरुस्तीचं काम १५ दिवसांत तर उर्वरित १५ दिवसांत दुसऱ्या दिशेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं आहे.

वेळेआधीच काम पूर्ण

पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची वेळ ही वेळापत्रकानुसार २५ डिसेंबरपर्यंत होती. परंतू, वेळेआधीच म्हणजे २१ डिसेंबर रोजी या पूलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं. यानंतर २४ तासांच्या क्यूरिंगनंतर २३ डिसेंबरला सकाळी वर्सोवा पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा-

वर्सोवा पूल अवजड वाहतुकीस महिनाभर बंद

वर्सोवा पूल दुपारी दोनपर्यंत बंद, मुंबई-अहमदाबाद मार्गावरून प्रवास टाळा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा