वर्सोवा पूल अवजड वाहतुकीस महिनाभर बंद


SHARE

वर्सोवा पूल दुरुस्तीच्या कामाला मंगळवारी 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याने हा पूल अवजड वाहतुकीसाठी महिनाभर बंद असणार आहे. 27 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत या पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

या पुलाच्या पहिल्या मार्गिकेच्या दुरुस्तीदरम्यान दुसऱ्या मार्गिकेवरून हलक्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर विरार, पालघर, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील या वर्सोवा पुलावर येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आता दुरुस्तीपर्यंत या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. 


वाहतूक कोंडी वाढणार

या पुलाच्या पहिल्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचं काम हाती घेतलं जाणार आहे. यादरम्यान चिंचोटी, शिरसाट फाटा आणि मनोर या मार्गाचा वापर अधिक होणार असल्याने भिवंडी जंक्शनवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या