Advertisement

वर्सोवा पूल दुपारी दोनपर्यंत बंद, मुंबई-अहमदाबाद मार्गावरून प्रवास टाळा


वर्सोवा पूल दुपारी दोनपर्यंत बंद, मुंबई-अहमदाबाद मार्गावरून प्रवास टाळा
SHARES

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील 43 वर्षे जुना वर्सोवा पूल मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या तपासणीसाठी महामार्ग प्राधिकरणाकडून तब्बल पाच तास बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होणार असल्याने या महामार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रवाशांना महामार्ग प्राधिकरण तसेच वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मंगळवारी दिवसभरात प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर हा विचार बदला.


गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वसई खाडीवरील जुना वर्सोवा पुलाच्या गर्डरला तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने हा पूल तब्बल नऊ महिन्यांसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुलाची दुरूस्ती करत मे महिन्यांत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानुसार या पुलावरील एका मार्गिकेवरून लहान तर एका मार्गिकेवरून जड वाहने सोडली जातात. पण असे असले तरी या पुलाची नियमित पाहणी-तपासणी करण्याची गरज असल्याने दर तीन ते चार महिन्यांनी पुलाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत हा पूल तपासणीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ज्या गर्डरची दुरूस्ती करण्यात आली आहे, त्या भागाची विशेषत्वाने मंगळवारी तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हा सर्वात महत्त्वाचा पूल असल्याने मुंबईच्या आणि अहमदाबादच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. दरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहने भिवंडी-चिंचोटी मार्गे वळवली आहेत. याबरोबरच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा - 

जुना वर्सोवा पूल चार दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा