जुना वर्सोवा पूल चार दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला

 Mira Bhayandar
जुना वर्सोवा पूल चार दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला

ठाण्यातील जुना वर्सोवा खाडीपूल अखेर गुरूवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पूल मागील चार दिवसांपासून दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील हा महत्त्वाचा पूल आहे. त्यामुळे हा पूल बंद झाल्याने गेल्या चार दिवसांपासून महामार्गावर वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. आता मात्र हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाल्याने वाहतूककोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.

वर्सोवा पूल जुना झाला असून पुलाला तडेही गेले आहेत. तडे गेल्याने 2013 मध्ये सहा महिन्यांसाठी हा पूल दुरूस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर आॅक्टोबर 2016 मध्ये पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला. आॅक्टोबर 2016 पासून या पुलावरून केवळ हलकी वाहनेच धावत आहेत. असे असताना 14 मे पासून चार दिवसांसाठी हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करत पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Loading Comments