Advertisement

खूशखबर! एसी लोकलच्या तिकीट दरवाढीला स्थगिती

४ डिसेंबरनंतर लोकलचे तिकीट दर वाढणार का? अशी भीती प्रवाशांच्या मनात होती. मात्र, पश्चिम रेल्वे बोर्डानं नाताळच्या मुहूर्तावर प्रवाशांना गिफ्ट दिलं आहे. प्रवाशांना २४ एप्रिल २०१९ पर्यंत ही सवलत कायम राखण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

खूशखबर! एसी लोकलच्या तिकीट दरवाढीला स्थगिती
SHARES

एसी लोकलला प्रवाशांचा मिळणार प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं तिकीट दरवाढ स्थगित केली आहे. एसी लोकलच्या तिकीट-पास धारकांना आणखी ४ महिने तिकिट सवलत देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यामुळे २४ एप्रिल २०१९ पर्यंत प्रवाशांना सवलतीच्या दरांत एसी लोकलचा प्रवास करता येणार आहे.


तिकीट दराचा निर्णय

एसी लोकलला प्रवाशांचा कितीपत प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता असल्याने सुरूवातीच्या टप्प्यात एसी लोकलचं तिकीट सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी तिकीटदरांच्या १.३ पट ठेवण्याऐवजी १.२ पट ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता.


सवलत कायम

मात्र, ही सवलत २४ डिसेंबर २०१८ रोजी पर्यंतच होती. त्यामुळं २४ डिसेंबरनंतर लोकलचे तिकीट दर वाढणार का? अशी भीती प्रवाशांच्या मनात होती. मात्र, पश्चिम रेल्वे बोर्डानं नाताळच्या मुहूर्तावर प्रवाशांना गिफ्ट दिलं आहे. प्रवाशांना २४ एप्रिल २०१९ पर्यंत ही सवलत कायम राखण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.



हेही वाचा-

एसी लोकलची वर्षपूर्ती, वर्षभरात ३८.६८ लाख प्रवाशांनी केला प्रवास

मुंबईकरांसाठी नववर्षाची भेट! मुंबई ते नवी मुंबई प्रवास करा वाॅटर टॅक्सीने



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा