Advertisement

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेनं तिन्ही मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पार्टीसाठी निघालेल्या मुंबईकरांना रेल्वेनं दिलासा दिला आहे.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल
SHARES

दरवर्षी लाखो मुंबईकर मोठ्या उत्साहात ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचं दमदार स्वागत पार्टीचा बेत आखतात. मात्र, यंदा पार्टीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईरांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रेल्वेनं तिन्ही मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पार्टीसाठी निघालेल्या मुंबईकरांना रेल्वेनं दिलासा दिला आहे.  

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेमार्गावर मध्यरात्री चर्चगेट ते विरारपर्यंत चार आणि विरार ते चर्चगेटपर्यंत चार विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. या सर्व लोकल धिम्या मार्गावरून सोडण्यात येणार आहेत. तसंच, मध्य रेल्वेवर दोन आणि हार्बर मार्गावर दोन विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.


पश्चिम रेल्वे - डाऊन मार्ग

 • पहिली लोकल चर्चगेट स्थानकातून मध्यरात्री १.१५ वाजता सुटणार असून विरार स्थानकात पहाटे २.५५ वाजता पोहोचेल. 
 •  दुसरी लोकल मध्यरात्री २ वाजता सुटणार असून विरार स्थानकात पहाटे ३.४० वाजता पोहोचेल. 
 •  तिसरी लोकल मध्यरात्री २.३० वाजता सुटणार असून विरार स्थानकात पहाटे ४.१० वाजता पोहोचेल. 
 •  चौथी लोकल पहाटे ३.२५ वाजता सुटणार असून विरार स्थानकात सकाळी ५.०५ वाजता पोहोचेल.


अप मार्गावरील लोकल

 •  पहिली लोकल विरार स्थानकातून रात्री १२.१५ वाजता सुटणार असून चर्चगेट स्थानकात पहाटे १.४७ वाजता पोहोचेल. 
 •  दुसरी लोकल मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार असून चर्चगेच स्थानकात पहाटे २.१७ वाजता पोहोचेल. 
 •  तिसरी लोकल मध्यरात्री १.४० वाजता सुटणार असून चर्चगेच स्थानकात पहाटे ३.१२ वाजता पोहोचेल. 
 •  चौथी लोकल पहाटे ३.०५ वाजता सुटणार असून चर्चगेच स्थानकात सकाळी ४.३७ वाजता पोहोचेल.


मध्य रेल्वे 

 • पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून मध्यरात्री १.३० वाजता सुटणार असून कल्याण स्थानकात पहाटे ३ वाजता पोहोचेल
 •  दुसरी लोकल कल्याण स्थानकातून मध्यरात्री १.३० वाजता सुटणार असून सीएसएमटी स्थानकात पहाटे ३ वाजता पोहोचेल. 


हार्बर रेल्वे 

 • पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून मध्यरात्री १.३० वाजता सुटणार असून पनवेल स्थानकात २.३० वाजता पोहोचेल 
 • दुसरी लोकल पनवेल स्थानकातून मध्यरात्री १.३० वाजता सुटणार असून सीएसएमटी स्थानकात २.५० वाजता पोहोचेल.

हेही वाचा -

मुंबईतून धावणार आणखी एक 'राजधानी एक्स्प्रेस'

मुंबईकरांना लवकरच मिळणार पहिली 'मेगा लोकल'
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा