नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने (TIFAC) श्रमिक शक्ती मंच (Shramik Shakti Manch (SAKSHAM) नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे. जे मजूरांना त्यांच्या मूळ ठिकाणी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी व्हॉट्सअ‍ॅपवर जोडेल.

द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 देशभरात पसरला असताना त्या काळातच श्रमिकची निर्मिती झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे काम नसल्यानं लाखो परप्रांतीय कामगार, मजूरांना आपापल्या घरी परतावं लागलं. अनेक मजूरांनी या काळात आपली नोकरी गमावली.

या पोर्टलवर भारतातील MSME चा संपूर्ण नकाशा आहे. नोकरीची उपलब्धता आणि त्यांना आवश्यक असलेलं कौशल्य वापरून हे पोर्टल त्यांच्या प्रांतातील संभाव्य रोजगाराच्या संधी असलेल्या मजुरांशी जोडले जाईल. ७२०८६३५३७० या नंबर Hi पाठवून मजूर संपर्क साधू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर 'हाय' पाठवल्यानंतर आता मजुरांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्या मिळणार आहेत.

एखाद्या मजूरानं व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटवर मेसेज पाठवल्यानंतर पोर्टल त्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाविषयी माहिती घेईल. त्याच माहितीच्या आधारे AI सिस्टम जवळच्या उपलब्ध नोकरीची प्रदात्याशी त्या लोकांना कनेक्ट करेल.


हेही वाचा

वर्सोवा सिलिंडर स्फोट: गोदामाच्या मालकाला अटक

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?

पुढील बातमी
इतर बातम्या