Advertisement

वर्सोवा सिलिंडर स्फोट: गोदामाच्या मालकाला अटक

वर्सोवतल्या यारी रोडवरील अंजुमन स्कूल परिसरात बुधवारी LPG सिलेंडर गोदामाला आग लागली.

वर्सोवा सिलिंडर स्फोट: गोदामाच्या मालकाला अटक
SHARES

वर्सोवतल्या यारी रोडवरील अंजुमन स्कूल परिसरात बुधवारी LPG सिलेंडर गोदामाला आग लागली. सुरुवातीला गोदामात स्फोट होऊ लागले. त्यानंतर भीषण आग पकडली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करून कारवाई केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गोदाम मालकाला अटक केली आहे. हाथी वाडिलाल असं गोदाम मालकाचं नाव आहे. पोलिसांनुसार, रहिवासी परिसरात अनधिकृत असं गोदाम चालवत होता. गेल्या ७ ते ८ वर्ष तो या परिसरात गोदाम चालवत होता. महत्त्वाचं म्हणजे गोदामाच्या जवळच एक शाळा देखील आहे.  

या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राकेश कडू (३०), लक्ष्मण कुमावत (२४), मुकेश कुमावत (३०) आणि मनजीत खान (२०) अशी या चौघांची नावं आहेत.  

आग इतकी भयंकर होती की अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी हजर होत्या. याशिवाय गोदामातील सिलेंडरचा एकामागून एक स्फोट होत होता. परिसर स्फोटांच्या आवाजानं दुमदुमला होता.



हेही वाचा

कांदा पुन्हा सामान्यांना रडवणार

कोव्हॅक्सीन लसीची चाचणी मुलांवरही होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा