मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान विभागानं जाहीर केल्यानंतर सोमवारी पावासानं हजेरी लावली. विविध भागांत पावासानं विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस मुंबईत पाऊस जोरदार हजेरी लावणार, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत कुलाबा येथे २७.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून महिन्यात सरासरी ४९३.१ मी.मी. पावसाची नोंद होत असते. मात्र हवामान खात्याच्या सांताक्रुझ विभागात आतापर्यंत २४५.५ मि.मी. म्हणजेच ४९.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच या महिन्यातील ५० टक्के पावसाची नोंद निसर्ग चक्रीवादळाच्या काळात झाली आहे. स्कायमेटद्वारे १५ ते १८ जूनदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम उपनगरात पाणी तुंबल्यानं दुपारी अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पुढील २ दिवस काही भागांत जोरदार सरी कोसळतील. या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण वाढण्याची चिन्हं आहेत.


हेही वाचा -

लोकलनं पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रवास

अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच


पुढील बातमी
इतर बातम्या