Advertisement

लोकल सेवेसाठी राज्य सरकारची केंद्राकडं मागणी

मुंबईत नागरिकांची पुन्हा गर्दी होत आहे. अनेक जण कामाला जाण्यासाठी बेस्ट बसचा वापर करत आहेत. त्यामुळं गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

लोकल सेवेसाठी राज्य सरकारची केंद्राकडं मागणी
SHARES

मुंबईसह राज्यभरातत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका हा गर्दीच्या ठिकाणी अधिक आहे. त्यामुळं राज्य सरकारनं लोकल, रिक्षा, टॅक्सी यांची वाहतूक सेवा बंद केली. परंतु, आता अनलॉक १.० अंतर्गत मुंबईसह राज्यभरात दुकानं व खाजगी कार्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. परिणामी मुंबईत नागरिकांची पुन्हा गर्दी होत आहे. अनेक जण कामाला जाण्यासाठी बेस्ट बसचा वापर करत आहेत. त्यामुळं गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं हालचाल सुरू केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं केली आहे.

लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना एसटीनं प्रवास करणं कठिण जातं. एसटीपेक्षा रेल्वेनं लवकर कामाच्या ठिकाणी पोहोचता येतं. त्यामुळं रेल्वे मंत्रालयानं लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. लोकल सेवा सुरू व्हावी म्हणून रेल्वे मंत्रालयाच्या संपर्कात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. किमान अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी तरी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - कांदिवलीतून बेपत्ता झालेल्या 'त्या' ज्येष्ठ नागरिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू ?

कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथून मुंबईत कामावर येणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही या भागात मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळं या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईत कामावर येण्यासाठी ज्यादा एसटी सोडण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी मुभा दिली आहे. 

या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळं बस आणि एसटीमध्ये निम्म्याच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवाय एसटी आणि बसेसही अपुऱ्या पडत असल्याने राज्य सरकारने रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्राकडं मागणी केल्याचं समजतं.



हेही वाचा -

मुंबई महापालिकेच्या प्रभारी उपायुक्तांचं कोरोनामुळे निधन

लॉकडाऊनमध्ये Parle-G ची रेकॉर्ड ब्रेक विक्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा