Advertisement

मुंबई महापालिकेच्या प्रभारी उपायुक्तांचं कोरोनामुळे निधन

काही दिवसांपूर्वी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारा दरम्यान त्यांचटा मृत्यू झाला.

मुंबई महापालिकेच्या प्रभारी उपायुक्तांचं कोरोनामुळे निधन
SHARES

कोरोनाची लागण झाल्यानं मुंबई महापालिकेचे (BMC) विशेष प्रकल्पाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचं निधन झालं. शिरीष दीक्षित (Sirish dixit) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी दीक्षित यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष दीक्षित महापालिकेच्या विशेष पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता होते.

तर दुसरीकडे, मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं मंगळवारी कोरोनामुळे ठाण्याच्या वेदांत रुगणालयात निधन झालं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. आमदार सरनाईक यांनी हरिशचंद्र आमगावरकर यांन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आठवड्यापूर्वी नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये त्यांच्या पत्नीला डीचार्ज देण्यात आला होता तर भाऊ आणि आई या सध्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. हरिशचंद्र आमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेतमध्ये दोन टर्म नगरसेवक होते.

दरम्यान मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १०९ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३१४ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोना बाधीत रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.



मीरा- भाईंदरमधील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

शताब्दी रुग्णालयातून ८० वर्षीय कोरोनाग्रस्त बेपत्ता रुग्णाचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा