Advertisement

मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर 'ह्या' आयएएस अधिकाऱ्यांची नजर

मुंबईतील महत्वाच्या मोठ्या ३५ खाजगी रुग्णालयांवर ५ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर 'ह्या' आयएएस अधिकाऱ्यांची नजर
SHARES

मुंबईतील खाजगी रुग्णालयांच्या कारभारावर आता आयएएस अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे. मुंबईतील महत्वाच्या मोठ्या ३५ खाजगी रुग्णालयांवर ५ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदन नागरगोजे, अजित पाटील, प्रशांत नारनवरे, सुशील खोडवेकर आणि राधाकृष्णन या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

८० टक्के बेड ताब्यात घेण्याबरोबरच शासकीय दरानुसार बिल घेतले जाते की नाही यावर आता लक्ष असणार आहे. कोरोना संकटकाळात नियमापेक्षा जादा बील उकळल्यास या संबंधित अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे तक्रार करता येणार आहे. बेड उपलब्ध होण्यासंदर्भातील डॅशबोर्ड अंमलबजावणीला यामुळे हातभार लागणार आहे.


ह्या अधिकाऱ्यांकडे ह्या रुग्णालयांची जबाबदारी

मदन नागरगोजे - बॉम्बे हॉस्पिटल, सैफी, जसलोक, ब्रीच कँडी, एच.एन. रिलायन्स रुग्णालय,  भाटिया रुग्णालय, SRCC रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पाटील - मसिना हॉस्पिटल, वोकहार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान, ग्लोबल, के.जे. सोमैया, गुरु नानक आणि पी.डी. हिंदुजा रुग्णालयाची जबाबदारी. 


राधाकृष्णन - एसएल रहेजा, लीलावती, होली फॅमिली, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बीएसईएस, सुश्रुषा हॉस्पिटल आणि होली स्पिरीट हॉस्पिटल


सुशील खोडवेकर - कोहिनूर हॉस्पिटल, हिंदु सभा, एसआरव्ही चेंबूर, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल.एच. हिरानंदानी, सुराणा सेठिया आणि फोर्टिस हॉस्पिटल

प्रशांत  नारनवरे - करुणा हॉस्पिटल, कोकिलाबेन, संजीवनी, नानावटी, अ‍ॅपेक्स आणि अॅनी अॅपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल



हेही वाचा -

राज्यात २५५३ नवीन रुग्णांची नोंद, तर दिवसभरात १०९ जणांच्या मृत्यूची नोंद

कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा