Advertisement

शताब्दी रुग्णालयातून ८० वर्षीय कोरोनाग्रस्त बेपत्ता रुग्णाचा मृत्यू


शताब्दी रुग्णालयातून ८० वर्षीय कोरोनाग्रस्त बेपत्ता रुग्णाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयातून रुग्णा पळाल्याच्या घटनांमध्ये आता वाढ होत आहे. मुंबईतील कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून ८० वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पळालेल्या वद्ध रुग्णाचा मृतदेह पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर सापडला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनावर चांगलीच टीका केली जात असून, पुन्हा एकदा सेवा आणि उपचारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.

८० वर्षांचे हे आजोबा मालाड परिसरात राहत होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्यांना ३ दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी पहाटेपासून या आजोबांचे नातेवाईक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर शेजारच्या बेडवर अॅडमिट असलेल्या एका रुग्णानं फोन उचलला आणि रुग्ण सकाळपासून बेडवर नसल्याचं सांगितलं.

हेही वाचा - महापालिका रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेपासून ८० वर्षीय आजोबा बेपत्ता होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात ते उपचार घेत होते. परंतु, रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईंकांनी केला आहे. याप्रकरणी शताब्दी रुग्णालयातून कोरोनाग्रस्त वृध्द पळून गेल्याच्या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले हे रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची परिस्थिती लक्षात घेऊन कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं अमेय घोले यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासगीसह पालिकेच्या रुग्णालयात कोरोना वॉर्डची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच, अनेक ठिकाणी विलगीकरण केद्र सुद्धा तयाक केली आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळं खाटाही आता कमी पडत असल्याचं समजतं. 



हेही वाचा -

टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा अधिक धोका, शास्त्रज्ञांचा दावा

९० च्या दशकातील गुन्हेगारांचे कर्दनकाळ सचिन वाझे पुन्हा गुन्हे शाखेत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा