Advertisement

महापालिका रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज

गर्दी झाल्यास रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं रुग्णसंख्या वाढू नये यासाठी महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतला आहे.

महापालिका रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं सतत गजबजलेली मुंबई शांत झाली होती. कोरोनाच्या भीतीमुळं आणि राज्य सरकारच्या आव्हानामुळं कोणताही नागरिक घराबाहेर विनाकारण निघत नव्हता. परंतु, दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता केल्यानंतर मुंबईकरांना नव्या जगण्याला पुन्हा सुरूवात केली. सोमवारी पुन्हा एकदा काहीशा प्रामाणात गजबजलेल्या मुंबईच चित्र पाहायला मिळालं. परंतु गर्दी झाल्यास रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं रुग्णसंख्या वाढू नये यासाठी महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील अनेक व्यवहार सोमवारी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. मुंबईमध्ये लॉकडाउनचे निर्बंधात शिथिलता आणल्यानंतर रुग्णसंख्या वाढीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ही संख्या वाढल्यास आरोग्यव्यवस्थेवर ताण येऊ नये यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. वॉर्डनिहाय सुरू झालेल्या वॉर रूममुळं रुग्णांची त्याच प्रभागामध्ये नोंद ठेवणं व त्यांच्या लक्षणांनुसार सीसीसी केंद्रांमध्ये त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात येत आहे.

या निर्णयामुळं मुख्य रुग्णालयांवर येणारा ताण कमी होऊन रुग्णसंख्येचं योग्य प्रमाणात नियोजन करता येणं शक्य होईल, असा विश्वास महापालिकेला आहे. नागरिकांची गर्दी वाढल्यामुळं रुग्णसंख्येत वाढ झाली, तर तो परिणाम पुढील ४ दिवसांत दिसून येईल. रुग्णसंख्येची वाढ कशी व कोणत्या टप्प्यांत होत आहे, याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचं लक्ष असून, वॉर्डनिहाय आरोग्य यंत्रणेलाही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळं सामान्यांकडूनही लक्षणांमध्ये बदल, तातडीनं आरोग्यसेवा हवी असण्याची उपयुक्तता याबद्दलची माहिती उपलब्ध होणार आहे.

नव्या निकषांनुसार सौम्य लक्षणे असलेले तसेच ज्यांच्याकडे घरी राहण्याची सुविधा आहे, ते रुग्ण घरात काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनखाली राहू शकतील. रुग्णांना भीतीपोटी रुग्णालयामध्ये आणण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत रुग्णसेवा नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. मुंबईचा रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होत आहे. मृत्युदरही कमी झाला आहे.



हेही वाचा -

राज्यात २५५३ नवीन रुग्णांची नोंद, तर दिवसभरात १०९ जणांच्या मृत्यूची नोंद

कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा