कांदिवलीतून बेपत्ता झालेल्या 'त्या' ज्येष्ठ नागरिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू ?

8 जून रोजी सायंकाळी 7 वा. कुणालाही न सांगताच मुळे रुग्णालयातून निघून गेले. मुळे कुठे ही आढळून न आल्याने रुग्णालायतून त्यांच्या कुटुंबियांना मुळे बेपत्ता असल्याचे कळवले

कांदिवलीतून बेपत्ता झालेल्या 'त्या' ज्येष्ठ नागरिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू ?
SHARES
शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या त्या 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे आता उघडकीस आले आहे. विठ्ठल मुळे असे मृत वृद्धाचेे नाव होते. शनिवारी त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या

मालाड परिसरात राहणारे मुळेे  यांना शनिवारी पोट दुखी, ताप आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतेे. मुळे यांच्यावर उपचार सुरू असताना, 8 जून रोजी सायंकाळी 7 वा. कुणालाही न सांगताच मुळे रुग्णालयातून निघून गेले. मुळे कुठे ही आढळून न आल्याने रुग्णालायतून त्यांच्या कुटुंबियांना मुळे बेपत्ता असल्याचे कळवले. त्यानंतर मुळेंचा शोध घेण्यास नातेवाईकांनी सुरूवात केली.  दरम्यान मुळेे यांच्या कुटुंबियांना रेल्वे स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे कळाले. त्यावेळी मुळेंचा शोध घेत कुटुंबिय त्या ठिकाणी पोहचले असता मुळेंची ओळख पटली.

बहुदा ते घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना, फाटक ओलांडताना रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी  मुळे यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले असता. डाँक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक चौकशीत मुळे यांना उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनीच रुग्णालयात दाखल केले होते. माञ उपचारा दरम्यान कुणाला ही न सांगता ने निघून गेल्याचे चौकशीत पुढेे आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. माञ मुळे यांंनी आत्महत्या केली की, त्यांचा अपघातात मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे पोलिस संबधित रेल्वेच्या मोटरमन जबाब नोंदवूूून पुढे निष्कर्ष काढू शकतात.



 या घटनेनंतर मुळे यांचे नातू यांनी भाजपचे नेते विनोद मिश्रा यांना पञ लिहून रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केेेेला. ते पञ मिश्रा यांनी ट्विट ही केले आहे.  त्या पञात मुळेे यांचे नातू यांनी मुळेंच्या पोटात दुखत असून त्यांना ताप येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होतेे. त्यांची कोविडची चाचणी ही घेण्यात आली होती, ज्याचा अहवाल येणं बाकी होतं. ज्या वार्डात मुळे यांना ठेवण्यात आले होतेे. त्यात कोविडचे रुग्ण होतेे. त्यामुळे मुळे कदाचित घाबरले असावेत असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा