मुंबई पोलिस दलातील ९०५ पोलिसांनी केली कोरोनावर मात

आनंदाचीबाब म्हणजे २४ तासांत राज्यात एका ही पोलिसांला कोरोनाची लागण झालेली नाही. तर मुंबईत आतापर्यंत १९०८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात २६७ पोलिस अधिकारी १६४१ पोलिस कर्मचाऱ्यांची नोंद आहे.

मुंबई पोलिस दलातील ९०५ पोलिसांनी केली कोरोनावर मात
SHARES

कोरोना(Coronavirus)विरुद्ध लढण्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस उभे आहेत. अपुरे मनुष्यबळ, कटेंन्मेंट झोन मधील बंदोबस्त, २४  तास सेवा आणि वाढणारे रुग्ण... सभोवताली परिस्थिती गंभीर असूनही पोलिस स्वत: चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. मुंबई बुधवारी दिवसभरात तब्बल ९०५ मुंबई पोलिसांनी (Mumbai police) कोरोनावर मात केली आहे. तर २५८ पोलिस कर्माचारी हे पूर्णतहा बरे होऊन ड्युटीवर हजर झाले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे.  

हेही वाचाः- कांदिवलीतून बेपत्ता झालेल्या 'त्या' ज्येष्ठ नागरिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू ?

राज्यात कोरोना बाधित पोलिसांमध्ये १८८ पोलीस अधिकारी १२१२  पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. आनंदाचीबाब म्हणजे २४ तासांत राज्यात एका ही पोलिसांला कोरोनाची लागण झालेली नाही. तर मुंबईत आतापर्यंत १९०८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात २६७ पोलिस अधिकारी १६४१ पोलिस कर्मचाऱ्यांची नोंद आहे. मात्र यातील ५४३ जणांना क्वारनंटाईन करण्यात आले आहे. तर २३६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३१ जणांमध्ये अतिसौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना घरीच क्वारनटाईन करण्यात आले आहे. तसेच १७२ पोलिस कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. तर ६४७ जणांनी कोरोनावर मात केली असली, तरी त्यांना क्वारनंटाईन करण्यात आले आहे. तर २५८ जणांनी कोरोनावर मात करून सेवेत पून्हा हजर झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र दुर्दैवी या महामारीने आतापर्यंत राज्यात ३४ पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईतील २१ जणांचा समावेश आहे.  

हेही वाचाः- खाकी वर्दीतली माणुसकी, स्नेहसंमेलना ऐवजी केली अनोखी मदत

मुंबई पोलिस दलातील ९०५ योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे अंदाजे हजार पोलिसांना विलगीकरण कक्षात ठेवले असले. तरी त्यांच्यात कोरोनाची कोणतिही लक्षण आढळून आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईत पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत ७७ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय ५५ वर्षावर्षीय पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच ५० वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या१०  ह जार होमगार्ड, १२०० केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा