Advertisement

लॉकडाऊनमध्ये Parle-G ची रेकॉर्ड ब्रेक विक्री

लॉकडाऊन (Lockdown 5.0)च्या काळात सर्वांचा आधार ठरली ती पार्ले जीची बिस्कीटं...

लॉकडाऊनमध्ये Parle-G ची रेकॉर्ड ब्रेक विक्री
SHARES

Parle G… चहासोबत हमखास खाल्लं जाणारं बिस्कीट... खिशाला परवडणारे दर आणि एका पाकिटात ४ ते ५ जण आरामात खातील एवढी बिस्कीटं... इतर वेळी क्रिमची, काजू-बदामच्या बिस्कींटांची चलती असेलही. पण लॉकडाऊन (Lockdown 5.0)च्या काळात सर्वांचा आधार ठरली ती पार्ले जीची बिस्कीटं...  

लॉकडाऊन दरम्यान या Parle G ला इतकी मागणी वाढली की, पार्लेजी बिस्किटं बाजारात मिळतच नव्हती. दुकानात आली की त्याचा फडशा पडायचा. इतका बिस्कीटांचा तुटवडा निर्माण झाला होता. याचं मुख्य कारण म्हणजे घरात अनेकांनी पार्ले-जी चा साठा केला होता. तर मजुरांना वाटप करण्यासाठी Parle G बिस्कीट उपयोगी पडली. याचा परिणाम की, गेल्या ८० वर्षांत झाली नाही तेवढी विक्री या बिस्किटांची लॉकडाऊनच्या काळात झाली.

कोरोना (Coronavirus Update) विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत पार्ले जी अनेकांचा आधार ठरला. हेच कारण आहे की, गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांची भूक भागवणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांची विक्री मोठ्या संख्येनं वाढली.

पार्ले-जीने गेल्या ८२ वर्षातील विक्रम मोडला आहे. अवघ्या ५ रुपयांत मिळणारे पार्ले-जी बिस्किटांनी शेकडो किलोमीटर चालणाऱ्या प्रवाशांची भूक भागवली आहे. काहींनी ते स्वत: विकत घेतले आणि इतरांनी मदतीसाठी बिस्किटे वितरीत केली. बऱ्याच जणांनी घरातच पार्ले-जी बिस्किटांचा साठा करुन ठेवला. जेणेकरून चहासोबत बाकी काही नाही तर पार्ले जी खाता येईल.

पार्ले प्रॉडक्टचे प्रमुख मयांक शाह यांनी सांगितलं की, मार्केट शेअरमध्ये आमची ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीत ९० टक्के वाटा पार्ले जी या लोकप्रिय बिस्किटांचा आहे.

मुंबईत विलेपार्ले इथं असणाऱ्या बिस्किटांच्या कारखान्यात गेल्या ८ दशकापासून बिस्किटं तयार होत आहेत. पण ८२ वर्षांत झाली नव्हती एवढी बिस्किटं या काळात विकली गेली, असं शहा यांनी सांगितलं. शहा यांनी नेमकी किती बिस्किटं खपली याची आकडेवारी दिली नाही. पण लॉकडाऊनच्या या तीन महिन्यात पार्लेजीला लक्षणीय मागणी होती. मागणी वाढल्यानं वितरण व्यवस्था, साखळी कोलमडली. नव्यानं ती उभारावी लागली, असंही शहा यांनी मान्य केलं.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात पार्ले कंपनीनं रोजनदारीवर काम करमाऱ्या कामगारांना मदतीचा हात दिला होता. पार्ले बिस्कीट हे गरीबांचं खाद्य समजलं जातं. त्यानुसार दर आठवड्यात १ कोटी अशा प्रकारे तीन आठवड्यात ३ कोटी पॅकेट्स देणार असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. त्यानुसार सरकारच्या मदतीनं गरजू लोकांना याचं वाटप करण्यात आलं.



हेही वाचा

लाॅकडाऊनचा मारुतीला फटका, 'अवघ्या' इतक्या कारची विक्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा