Advertisement

लाॅकडाऊनचा मारुतीला फटका, 'अवघ्या' इतक्या कारची विक्री

कोरोना व्हायरसमुळे देशभरात मागील दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका वाहन क्षेत्राला बसला आहे.

लाॅकडाऊनचा मारुतीला फटका, 'अवघ्या' इतक्या कारची विक्री
SHARES

कोरोना व्हायरसमुळे देशभरात मागील दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका वाहन क्षेत्राला बसला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या मे महिन्याच्या विक्रीमध्ये तब्बल 86 टक्के घट झाली आहे. मेमध्ये मारुती सुझुकीने अवघ्या 18 हजार 539 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने 1,34,641 वाहनांची विक्री केली होती.

लॉकडाऊनमुळे वाहन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्य़ा व्यवसायाला सुरूवात केली आहे.  मारुतीनेही 12 मेपासून काम सुरु केलं आहे. कंपनीने मे महिन्यात 4651 वाहनांची निर्यात केली होती.  मे 2019 च्या तुलनेत ही विक्री 48.82 टक्के कमी आहे. कंपनीने 12 मेपासून मानेसरमध्ये तर 18 मेपासून गुडगावमध्ये, सरकारी नियमाचं पालन करत वाहन निर्मितीचं काम सुरु केलं. 25 मेपासून गुजरातमध्ये उत्पादन सुरु करण्यात आलं. 

देशातील अनेक कंपन्या ऑनलाईनच कारची विक्री करत आहेत. ज्या लोकांना मारुती सुझुकीची कार खरेदी करायची आहे, त्यांना लोक कंपनीच्या वेबसाईटवरुन कार बुक करता येऊ शकते. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरच खरेदीचे आवश्यक कागदपत्र जमा करता येणार आहेत. त्यानंतर कंपनी जवळच्या डीलरशीपकडून कार घरपोच करण्यात येईल. कार घरी पोहचवण्यावेळी कारच्या सॅनिटायझेशनची काळजी घेण्यात येत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा -

24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या ९० सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा