Advertisement

मुंबई लोकल सुरु करण्याची जितेंद्र आव्हाड यांची मोदी सरकारकडे मागणी


मुंबई लोकल सुरु करण्याची जितेंद्र आव्हाड यांची मोदी सरकारकडे मागणी
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता महापालिका व राज्य सरकारनं लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मागील २ महीने लोकल बंद आहे. परंतु, मुंबईतील रुग्णालयांत सेवा देणाऱ्या बहुसंख्य कर्मचाऱ्याना लोकल सेवा सुरु नसल्यानं मोठ्या समस्यांना समोर जावं लागतं. त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारकडे केली.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. 'मुंबईतील रुग्णालयांत सेवा देणारे बहुसंख्य कर्मचारी दूर उपनगरांत किंवा मुंबईबाहेर राहतात. लोकल ट्रेनची सोय असल्याशिवाय ते कामावर रुजू होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मोदी सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरू कराव्यात', असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत ४० हजारांच्या पुढं गेली आहे. त्यांच्यावर मुंबई व उपनगरांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. मात्र, त्यांना सेवा देणारे कर्मचारी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये तसंच, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, विरारपर्यंत राहणारे आहेत. 

लोकल गाड्या सुरू नसल्यानं त्यांना रुग्णालयांत पोहोचताना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांत बेड असूनही कर्मचारी नसल्यानं ते मोकळेच पडून आहेत. आरोग्य कर्मचारी उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयांनाही पूर्ण क्षमतेनं रुग्णसेवा करणं शक्य होणार आहे.



हेही वाचा - 

पाणी साचल्यामुळं बेस्ट बसच्या मार्गात बदल

मुंबईवर मुंबादेवीची कृपा- उद्धव ठाकरे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा