Advertisement

पाणी साचल्यामुळं बेस्ट बसच्या मार्गात बदल

किंग सर्कल परिसरात पाणी साचल्यानं बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

पाणी साचल्यामुळं बेस्ट बसच्या मार्गात बदल
SHARES

किंग सर्कल परिसरात पाणी साचल्यानं बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मुंबईत दरवर्षी जस्तीचा पाऊस पडल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. मुंबईतील अंधेरी, कुर्ला, हिंदमाता, परळ, लालबाग, माटुंगा ही महत्वाची पाणी साचण्याची ठिकाणं आहेत. या भागांत गुडघाभर पाणी साचतं. सध्या मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडत असून, या पावसात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

बस क्रमांक ५ , ७ मर्या , ८ मर्या , ९ ,  १० मर्या , ११ मर्या , १६ मर्या , १९ मर्या . २० मर्या , २१ मर्या , २२ मर्या . २५ मर्या , २७ , ३० मर्या , ६६ , ६७ , ८५ , ९२ मर्या , १६५ , १६९ , १७१ ,  ३०५ , ३५१ , ३५४ , ३५७ , ३६८ मर्या , ३८५ , ४५३ मर्या , ५०४ मर्या , ५०६ मर्या , ५२१ मर्या , या बस चे प्रवर्तन भाऊ दाजी लाड मार्गे करण्यात आले आहे.

यंदा मुंबईत कोरोनाचं सावट असल्यानं सामान्य नगरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी वाहतूक सुविधा सुरु आहे. त्यामुळे या प्रवाशांना कामावर जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाण कोरोनाच्या रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेताना ही या पावसाचा सामना करावा लागत आहे.



हेही वाचा -

किंग्ज सर्कल येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली

निसर्ग चक्रीवादळामुळं स्थलांतरितांना स्क्रीनिंगनंतरच घरी पाठवणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा