Advertisement

किंग्ज सर्कल येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली


किंग्ज सर्कल येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली
SHARES

मुंबई उपनगरात गुरूवरी सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळल्यानंतर मुंबईतील पावसाचा पहिलाच दिवस असून, या पहिल्या पावसात मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्याशिवाय, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत असून किंग्ज सर्कल येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

मुंबईत सकाळी ९ वाजल्यानंतर अचानक हवामानात बदल झाला असून ढग दाटून मुसळधार पाऊस मुंबईत सर्वत्र कोसळत आहे. उपनगरात पावसाला अधिक जोर आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात सर्व भागांत गेल्या तासाभरापासून पाऊस पडत आहे. हवामान विभागाने सकाळी साडेनऊ वाजता पावसाबाबत अॅलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला असून पुढील तीन तासांत या जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई भागातही वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणं मुंबईत मान्सूनच्या आगमनाला अजून काही दिवसांचा अवकाश आहे. परंतु, मान्सूनपूर्व पावसातच मुंबईच्या अनेक भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महापालिकेच्या कामावर प्रश्न चिन्हं उपस्थित करण्यात येत आहे.



हेही वाचा -

मुंबईत जोरदार पावासाची हजेरी, पाणी साचण्याची शक्यता

निसर्ग चक्रीवादळामुळं स्थलांतरितांना स्क्रीनिंगनंतरच घरी पाठवणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा