Advertisement

निसर्ग चक्रीवादळामुळं स्थलांतरीत केलेल्या रहिवाशांना स्क्रीनिंगनंतरच घरी पाठवणार

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना २ दिवस म्हणजे ५ जूनपर्यंत निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळं स्थलांतरीत केलेल्या रहिवाशांना स्क्रीनिंगनंतरच घरी पाठवणार
SHARES

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता महापालिका प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्वाती पावलं उचलली. चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं पुढे सरकत असताना मुंबईच्या समुद्र किनारपट्टी नजीक राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षेसाठी स्थलांतरीत करण्यात आलं. यावेळी नागरिकांना घरातील महत्वाची कागदपत्र घेऊन स्थालांतर होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना २ दिवस म्हणजे ५ जूनपर्यंत निरीक्षणाखाली ठेवलं जाणार असून, त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना घरी सोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं धोका अद्याप टळलेला नाही त्यातच, आलेल्या या निसर्ग चक्रीवादळामुळं संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या भागांमधील सुमारे १९ हजार नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. दादर, माहिम, वरळी, वर्सोवा कोळावाडा वसाहतीतील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलं.

हेही वाचा - Cyclone Nisarga: महापालिकेच्या ३५ शाळांमध्ये राहण्याची सोय

चक्रीवादळाचा धोका टळला असला, तरी या नागरिकांना त्वरित घरी पाठवणे सध्याच्‍या करोनाच्या काळात योग्य नाही, ही बाब नजरेसमोर ठेवून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रशासनाला या नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.

'विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने सर्व स्थलांतरितांचे स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळतील, त्यांना करोना काळजी केंद्र २ मध्ये दाखल करण्यात येईल. ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नसतील, त्यांना तपासणीअंती दोन दिवसांनी म्हणजे ५ जून रोजी घरी पाठवावे. वैद्यकीय पथकांनी प्रत्येक स्थलांतरिताची तपासणी केल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे. या सर्व कार्यवाहीमध्ये विभाग कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी समन्वय साधावा', असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.हेही वाचा -

मुंबई विमानतळावर थोडक्यात अपघात टळला

Cyclone Nisarga: मुंबईचा धोका टळला, चक्रीवादळ निघालं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा