Advertisement

मुंबई विमानतळावर थोडक्यात अपघात टळला

मुंबई विमानतळावर मालवाहू विमानाचा अपघात टळला आहे.

मुंबई विमानतळावर थोडक्यात अपघात टळला
SHARES

मुंबई विमानतळावर मालवाहू विमानाचा अपघात टळला आहे. बंगळुरुहून आलेलं विमान निश्चित स्थळी न थांबता पुढे गेले. त्यामुळे एकमद गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी यावर तातडीनं उपाययोजना करीत विमान धावपट्टीवरुन बाजूला केलं.

बंगळुरुहून मुंबईत उतरत असताना FeD Ex हे विमान १४ क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरणार होते. मात्र हे विमान ठरवलेल्या ठिकाणी आणि वेळेत उतरले नाही तर तब्बल ९ मीटर पुढे गेले. त्यानंतर तातडीनं हे विमान दूर करण्यात आले. सुदैवानं या विमानाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. बंगळुरुहून आलेले मालवाहू विमान मुंबईला थांबून दुबईला रवाना होणार होते.

दरम्यान निसर्ग चक्रीवादळाचा धोका असल्यानं मुंबईतील हवाईसेवा दुपारी अडीच ते ७ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यात आला आहे.


दरम्यान कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले आहे. पुढील काही तासात हे वादळ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती सांगितली जात होती. मात्र मुंबईकरांसाठी आता दिलासादायक बाब आहे. चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गानं जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी वर्तवली आहे.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा