Advertisement

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, पाणी साचण्याची शक्यता


मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, पाणी साचण्याची शक्यता
SHARES

मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजोरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. या पावसामुळं मुंबईतीलसखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. दरवर्षी मुंबईत जास्तीता पाऊस पडला की, हिंदमाता, वरळी, परळ, लालबाग या परिसरात गुडघाभर पाणी साचतं. यावेळी पाणी साचल्यानं नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावाल लागतो. 

मुंबईत गुरूवारी सकाळ ढगाळ वातावरण असून नुकताच मुसळधार पावसानं जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली आहे. मुंबईसह नवीमुंबई, पनवेल भागात पाऊस पडत आहे. मुंबईत पाणी साचण्याची ठिकाणं लक्षात घेत महापालिकेनं दक्षता घेतली आहे. पावसाळ्यापूर्वीची काम अद्याप अनेक ठिकाणी पूर्ण झालेली नाही त्यामुळं पाणी साचण्याची शक्यता आहे.

मुंबईत दरवर्षी जुन महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा हवामान विभागानं पहिल्या पंधरवड्यात म्हणजे ८ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच, मान्सून दाखल होण्यापूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 



हेही वाचा -

Cyclone Nisarga: महापालिकेच्या ३५ शाळांमध्ये राहण्याची सोय

विधानभवन परिसरात कोसळली झाडं



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा